India vs Australia 2nd Test : दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, आर. अश्विन आणि  रोहित शर्मा संघाबाहेर
Indian Cricket Team ( Photo Credits: PTI )

India vs Australia 2nd Test : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसर्‍या कसोटी सामन्याला पर्थमधील (PerthTest) वाका स्टेडियमवर (Waca Stadium) उद्या (14 डिसेंबर) पासून सुरूवात होणार आहे. आज दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 13 खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघातून गोलंदाज आर. अश्विन (R.Ashwin) आणि फलंदाज रोहित शर्माला (Rohit Sharma) आराम देण्यात आला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या जबरदस्त खेळीमुळे ऑस्ट्रेलियावर भारताने 31 धावांनी विजय मिळवला होता.

पर्थ कसोटी सामन्यासाठी कसा असेल भारतीय संघ ?

विराट कोहली (कर्णधार) , एम. विजय, के.एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी,ऋषभ पंत (विकेटकिपर),रविंद्र जडेजा,इशांत शर्मा, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव.

कसोटी सामन्यांमध्ये भारताने विजयी सलामी देऊन सुरूवात केली आहे. त्यामुळे सध्या भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. अशीच विजयी कामगिरीचं सातत्य पर्थच्या मैदानावरही ठेवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. India Vs Australia 1st Test : ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने रचले हे नवे विक्रम  पर्थमधील खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे तज्ञांचं मत आहे.