India Vs Australia 1st Test: एडिलेड (Adelaide)मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियावर भारताने 31 धावांनी विजय मिळवला आहे. 4 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना टिकून राहणं अवघड झाले होते.
India win the first test match of the 4-match series against Australia by 31 runs. #INDvAUS pic.twitter.com/Tf8fZvInLB
— ANI (@ANI) December 10, 2018
ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावामध्ये 291 धावा केल्या. मोहम्मद शमी आणि जसप्रित बुमराह यांनी 3-3 विकेट्स घेतल्या. अश्विननेदेखील 3 विकेट्स घेतल्या. टॉस जिंकून भारताने फलंदाजी निवडली होती. भारताने पहिल्या डावात २५० धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला होता.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन या खेळाडूंनी खेळ सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न संघाला पराभवापासून बचावू शकले नाही.
कसोटी सामन्यांच्या या सीरिजमध्ये पुढे अजुन 3 सामने आहेत. पुढचा कसोटी सामाना 14 डिसेंबरपासुन सुरू होईल. पर्थमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. पर्थमधील खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे तज्ञांचं मत आहे.