India tour of Australia 2020: टिम पेनने ऐतिहासिक Gabba टेस्ट पराभवासाठी टीम इंडियाच्या लबाड रणनीतीला ठरवले जबाबदार, पहा काय म्हणाला
टिम पेन आणि अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

India tour of Australia 2020: ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन (Tim Paine) याने भारतीय क्रिकेट संघावर  (Indian Cricket Team) निशाणा साधला आणि म्हटले की, ज्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात अशा गोष्टींकडे विरोधी संघाचे लक्ष कसे वळवावे यात निपुण आहेत. भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील गाबा कसोटीबाबत (Gabba Test) विधान केले जिथे टीम इंडियाने (Team India) तीन विकेट्सने सामना जिंकून ऐतिहासिक 2-1 अशी डाऊन अंडर मालिका जिंकली. अशाप्रकारे भारताने सलग दुसरी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) 2020-21 खिशात घातली. कोविड-19 मुळे कठोर बायो-बबलच्या अतिशय कठोर प्रोटोकॉलमुळे टीम इंडिया ब्रिस्बेनच्या (Brisbane) गाबा मैदानावर हा सामना खेळण्यास नकार दिला असल्याचे वृत्त समोर आले होते. (IND vs AUS: ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजयानंतर Ajinkya Rahane याचे मनोबल उंचावणारे शब्द ऐकून तुम्हालाही वाटेल कॅप्टन असावा तर असा! Watch Video)

पेन म्हणाला की, “भारताविरुद्ध खेळण्याचे एक आव्हान म्हणजे विरोधी संघाला काय म्हणायचे आहे, त्यापासून विचलित कसे करावे यामध्ये पटाईत आहे. मालिकेत असे काही प्रसंग होते जेव्हा आम्ही त्यात गुंतलो. सर्वात मोठे उदाहरण म्हणजे जेव्हा त्याला गाबाला जायचे नाही अशी बातमी आली होती. पुढील सामना आम्ही कोठे खेळणार आहोत हे आम्हाला माहित नव्हते. अशा साइड शोमधून विरोधी संघाला सामन्यातून विचलित करतात.” टीम इंडियाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया संघावर सलग दुसऱ्यांदा त्याच्या देशात त्यांच्या देशात मात केली. 2018-19 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी देखील भारताने 2-1 ने जिंकली. ऑस्ट्रेलियामध्ये हा भारताचा पहिला कसोटी मालिका विजय होता. 2020-21 मध्ये पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली पॅटर्निटी रजेवर मायदेशी परतला ज्यानंतर अजिंक्य रहाणेने उर्वरित तीन कसोटी सामन्यात नेतृत्व केले. संघातील सर्व दिग्गज क्रिकेटपटू जखमी झाले असून टीम इंडियाने युवा खेळाडूंच्या जोरावर मालिकेत विजय मिळवला.

इतकंच नाही तर पेनने अ‍ॅशेस मालिकेनंतर कर्णधारपदाचा त्याग करण्याचे संकेत दिले. यंदा वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने कमकुवत भारतीय संघाकडून घरातील कसोटी मालिका गमावल्यानंतर पेनवर कर्णधारपद सोडण्याचा दबाव होता. पेनने कर्णधारपदासाठी स्टीव्ह स्मिथच्या नावाचे समर्थन केलेलं. स्मिथ संघाच्या अव्वल स्थानासाठी एक आदर्श उमेदवार असल्याचा पेनचे मत आहे. उल्लेखनीय म्हणजे, बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागासाठी स्मिथवर दोन वर्षासाठी बंदी घातल्यानंतर पेन याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.