Team India (Photo Credit - Twitter)

भारतीय महिला संघ टी-20 विश्वचषकातील (Women's T20 World Cup) त्यांच्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना करण्यासाठी (IND vs WI) सज्ज झाला आहे. टीम इंडियाने मेगा इव्हेंटच्या त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला, तर वेस्ट इंडिजला त्यांच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड महिलांकडून 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात टीम इंडियाला (Team India) आपली लय कायम ठेवायची आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजच्या महिलांना बाउन्स बॅक करायला आवडेल. दोन्ही संघांमध्ये निकराची लढत होऊ शकते. भारतीय खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याआधी या तुम्ही सामना लाइव्ह कुठे पाहू शकता जाणून घ्या...

कुठे पाहणार हाय व्होल्टेज सामना

भारत महिला आणि वेस्ट इंडिज महिला यांच्यातील टी-20 विश्वचषक सामना 15 फेब्रुवारी म्हणजे आज होणार आहे. हा सामना न्यूलॅंड्स, केपटाऊन येथे संध्याकाळी 6.30 वाजता (IST) सुरू होईल. आणि या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 6 वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रवाह स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत तुम्ही स्टॉप स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हा सामना पाहू शकता. भारत महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला यांच्यातील T20 विश्वचषक सामन्याचे थेट प्रसारण Disney+ Hotstar अॅपवर उपलब्ध असेल. मात्र यासाठी तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे. (हे देखील वाचा: WPL 2023 Schedule: महिला प्रीमियर लीगचे संपूर्ण वेळापत्रक इथे पाहा, संघातील लढत, मैदान आणि तारीख, जाणून घ्या संपूर्ण तपशील)

विश्वचषकासाठी दोन्ही संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, यास्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर.

वेस्ट इंडिज: हेली मॅथ्यूज (कर्णधार), रश्दा विल्यम्स (विकेटकीपर), शमाइन कॅम्पबेल, स्टॅफनी टेलर, शबिका गजनबी, चिनेल हेन्री, चाडियन नेशन, जाडा जेम्स, एफी फ्लेचर, शमिलिया कोनेल, शकीरा सेलमन, आलिया अॅलेने, करिश्मा होल्डर, त्रिशन रामहार्क जेनाबा जोसेफ