IND vs PAK (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Pakistan National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना 23 फेब्रुवारी (रविवार) रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता खेळला जाईल. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना जवळ आला आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात काही खास लढती पाहायला मिळतात, ज्यामध्ये शुभमन गिल विरुद्ध शाहीन आफ्रिदी, मोहम्मद रिजवान विरुद्ध कुलदीप यादव आणि बाबर आझम विरुद्ध मोहम्मद शमी असे संघर्ष आहेत. या खेळाडूंमधील लढाई या सामन्याचा निकाल ठरवू शकते. हे देखील वाचा: India vs Pakistan ODI Head To Head: एकदिवसीय सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणाचा वरचष्मा? येथे पाहा हेड टू हेड रिकॉर्ड

कोण वर्चस्व गाजवेल?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना नेहमीच रोमांचक असतो आणि वैयक्तिक पातळीवर या खेळाडूंमधील लढाई सामन्याचा निकाल ठरवू शकते. जर शाहीन, कुलदीप आणि शमी त्यांच्या रणनीतीत यशस्वी झाले तर भारतासाठी हा सामना सोपा होऊ शकतो. त्याच वेळी, गिल, रिझवान आणि बाबर त्यांच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.

शुभमन गिल विरुद्ध शाहीन आफ्रिदी: फॉर्म आणि स्विंगची लढाई

शुभमन गिल सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 78. 80 आणि 112 धावांच्या खेळी केल्या. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्ध 101 धावांची शानदार खेळीही केली. पाकिस्तानसाठी गिलची विकेट लवकरच घेणे खूप महत्वाचे असेल आणि यासाठी शाहीन आफ्रिदी सर्वात महत्त्वाचा गोलंदाज ठरू शकतो. सुरुवातीला गिलला त्याची स्विंग आणि वेगवान गोलंदाजी त्रासदायक ठरू शकते. गिलची विकेट शाहीनसाठी सामना बदलणारी ठरू शकते.

मोहम्मद रिझवान विरुद्ध कुलदीप यादव: बॅट आणि बॉलची लढाई

मोहम्मद रिझवान दबावाखाली चमकदार फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. परंतु या स्पर्धेत त्याची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तो फक्त 3 धावा करून बाद झाला होता. पाकिस्तानसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे, त्यामुळे रिझवानवर कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी असेल. त्याच वेळी, भारताची नजर कुलदीप यादववर असेल, ज्याची फिरकी गोलंदाजी रिझवानसाठी समस्या निर्माण करू शकते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यासाठी कुलदीप ओळखला जातो आणि तो पाकिस्तानच्या फलंदाजीचा कणा मोडू शकतो.

बाबर आझम विरुद्ध मोहम्मद शमी: दिग्गजांची लढाई

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम अलिकडच्या काळात त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही. परंतु, त्याच्याकडे कोणत्याही परिस्थीतीत एकट्याने सामना जिंकण्याची क्षमता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने 64 धावांची चांगली खेळी केली होती आणि तो भारताविरुद्धही मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या आणि लवकरच बाबरला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करेल. शमीची अचूक लाईन आणि लेंथ बाबरसाठी समस्या निर्माण करू शकते.