![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/ind-vs-eng-18-.jpg?width=380&height=214)
India National Cricket Team vs England Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना (IND vs ENG 3rd ODI 2025) आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळला जाईल. सामन्याला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल. भारताने आधीच 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडला आपला सन्मान वाचवण्याची संधी असेल. तर भारताला इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी असेल. या सामन्यात भारताच्या काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळू शकते. त्याच वेळी, अर्शदीप सिंगलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.
हेड टू हेड रेकाॅर्ड (IND vs ENG ODI Head to Head)
भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 109 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 60 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 44 वेळा विजय मिळवला आहे. 3 सामने निकालाविना संपले, तर 2 सामने बरोबरीत सुटले. दोन्ही संघांमधील ही स्पर्धा नेहमीच रोमांचक राहिली आहे, ज्यामध्ये भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
.@imVkohli's final assignment before his quest for a 4th ICC title begins with the #ChampionsTrophy! 💪
🚨 MILESTONE ALERT: Virat is 89 runs away from completing 14,000 ODI runs! #INDvENGonJioStar 3rd ODI 👉 WED, 12th FEB, 12:30 PM | Start watching FREE on Disney+ Hotstar! pic.twitter.com/Xmor0YFfDd
— Star Sports (@StarSportsIndia) February 12, 2025
कुठे पाहणार सामना? (IND vs ENG 3rd ODI Live Streaming)
भारत विरुद्ध इंग्लंड 2025 चा तिसरा एकदिवसीय सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. क्रिकेट प्रेमी हे रोमांचक सामने त्यांच्या टेलिव्हिजन सेटवर थेट पाहू शकतात. याव्यतिरिक्त, डिजिटल प्रेक्षकांसाठी लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ: बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, मार्क वूड, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर/ऋषभ पंत, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल/रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग/हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.