COVID-19: इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताच्या स्टार खेळाडूवर कोसला दुःखाचा डोंगर, कोरोनाने हिरावलं आईचे छत्र
बीसीसीआय (Photo Credits: IANS)

Priya Punia's Mother Dies: COVID-19 ने जगभरात अमर्यादित नुकसान केले आहे आणि भारतातील दुसर्‍या लाटेने (India COVID Second Wave) त्यात आणखी भर घातली. महामारीच्या या संकट काळात अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे आणि क्रिकेटपटूही याला अपवाद राहिलेले नाही. भारताच्या महिला क्रिकेटपटू प्रिया पुनियाच्या (Priya Punia) आईचे कोरोना व्हायरसने छत्र गमावले. पुनिया आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर याबाबत उघडपणे व्यक्त झाली आणि भावनिक पोस्ट शेअर केली. आपल्या आईच्या निधनाबद्दल पोस्ट करीत पुनियाने म्हटले की ती नेहमीच तिची मार्गदर्शक होती आणि कठीण स्थितीत तिने तिला नेहमीच तिला नेहमीच मजबूत पाठिंबा दिला. पोस्टमध्ये, युवा क्रिकेटरने तिच्या कुटुंबीयांसह बरेच फोटो शेअर केले ज्यात तिची आई तिच्याशी प्रेमळपणे पोज करताना दिसून येऊ शकते. (Veda Krishnamurthy वर कोसळला दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचे COVID-19 मुळे निधन)

“आज मला कळले की तू मला नेहमीच बलवान राहायला का सांगितलेस”, 24 वर्षीय पुनियाने इन्स्टाग्रामवर लिहिले. “तुला माहित होतं की एक दिवस मला तुला गमावण्याची त्रास सहन करावा लागेल. तुझी खूप आठवण येतेय आई! कितीही अंतर असले तरी मला माहित आहे की तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस. माझा मार्गदर्शक तारा, माझी आई .. नेहमीच तुझ्यावर प्रेम करते. आयुष्यातील काही सत्य स्वीकारणे कठीण आहे. तुझ्या आठवणी कधी विसरणार नाहीत! रेस्ट इन पीस आई,” ती पुढे म्हणाली. व्यावसायिक आघाडीवर प्रिया पुनियाबद्दल बोलायचे तर तिचा भारतबरोबरचा प्रवास फार जुना नाही. तिने 2019 मध्ये टी-20 तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुनियाने आतापर्यंत 7 एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्याचे आवाहनही प्रियाने आपल्या फॉलोअर्सना केले. “मास्क घाला, सामाजिक अंतर ठेवा, सुरक्षित रहा आणि मजबूत रहा,” तिने लिहिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Punia (@priyapunia16)

दरम्यान, क्रिकेटविश्वात कोरोनाने देखील पियुष चावला, चेतन सकारिया आणि आरपी सिंह यांनी देखील आपल्या वडिलांना गमावले आहे. शिवाय, भारतीय महिला संघाची धाकड फलंदाज वेदा कृष्णमूर्तीच्या आई आणि बहिणीचे देखील यापूर्वी निधन झाले होते.