विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credit: Getty)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उप-कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी मंगळवारी गलवान खोऱ्यात (Galwan Valley) शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना (Indian Soldiers) श्रद्धांजली वाहिली. महिन्याभरापासून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ मोठा तणाव आहे. आणि तणावपूर्ण परिस्थितीत सोमवारी रात्री अचानक गलवाण खोऱ्यात भारतीय (India) आणि चिनी (China) सैनिकांमध्ये अभूतपूर्व संघर्ष उदभवला. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले तर चीनचे 43 सैनिक ठार झाल्याचे वृत्त समोर आले. कोहलीने ट्विटरवर शहिदांना श्रद्धांजली देत लिहिले, "गॅलवान खोऱ्यात आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सैनिकांना सलाम आणि मनापासून आदर. सैनिकापेक्षा कुणीही निःस्वार्थ व धाडसी नाही. कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना. मला आशा आहे की या कठीण वेळी आमच्या प्रार्थनांद्वारे त्यांना शांती मिळेल." रोहित शर्मानेही याबद्दल शोक व्यक्त केला आणि खऱ्या नायकांना सलाम केला. (लडाखमध्ये शाहिद भारतीय जवानांना क्रिकेटपटुंनी वाहली श्रद्धांजली; संतप्त हरभजन सिंह म्हणाला-'चिनी उत्पादनांवर बहिष्कार घाला')

रोहितने दुःख व्यक्त केले आणि लिहिले, “आमच्या सीमेचे रक्षण आणि आदर करत प्राण गमावणाऱ्या आपल्या खऱ्या नायकांना सलाम. देव त्यांच्या कुटुंबियांना अखंड शक्ती देवो." यापूर्वी वीरेंद्र सहवाग, शिखर धवन, इरफान पठाणसारख्या खेळाडूंनीही शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

विराटचे ट्विट

रोहित शर्मा

45 वर्षात पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर झालेल्या संघर्षात जवान शहीद झाले आहेत. यापूर्वी 1975 साली अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी सैनिकांनी घात लावून केलेल्या हल्ल्यात भारताचे जवान शहीद झाले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री नियंत्रण रेषा तसेच गलवान आणि श्योक नदीच्या जंक्शनच्या भागात हा संघर्ष झाला. गलवान खोऱ्यातून चिनी सैन्याने माघार घ्यावी, यासाठी पेट्रोलिंग पॉईँट 14 वर दोन्ही बाजूच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु होती. हा भाग नियंत्रण रेषेजवळ आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.