Galwan Valley: लडाखमध्ये शाहिद भारतीय जवानांना क्रिकेटपटुंनी वाहली श्रद्धांजली; संतप्त हरभजन सिंह म्हणाला-'चिनी उत्पादनांवर बहिष्कार घाला'

लडाखच्या गालवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये जोरदार चकमक झाली ज्यामध्ये भारताचे 20 सैनिक शाहिद झाले. या चकमकीत भारतीय लष्कराचे कर्नल संतोष बाबू शहीद झाले आहेत. वीरेंद्र सहवागपासून शिखर धवन पर्यंत, लडाखमध्ये झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी क्रिकेट बंधू एकत्र आले.

Galwan Valley: लडाखमध्ये शाहिद भारतीय जवानांना क्रिकेटपटुंनी वाहली श्रद्धांजली; संतप्त हरभजन सिंह म्हणाला-'चिनी उत्पादनांवर बहिष्कार घाला'
भारत-चीन सैन्य, हरभजन सिंह (Photo Credit: PTI/Getty)

सोमवारी रात्री भारतीय (India) आणि चिनी (China) सैन्यांदरम्यान जे काही घडले त्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री लडाखच्या (Ladakh) गालवान व्हॅलीमध्ये (Galwan Valley) भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये जोरदार चकमक झाली ज्यामध्ये भारताचे 20 सैनिक शाहिद झाले. याची पुष्टी करणारे लष्कराने एक निवेदन जारी केले आहे, तर वृत्तसंस्था ANIच्या मते, चीनचे 40 हून अधिक सैनिक ठार झाले आहेत. या बातमीवरून संपुर्ण भारतभर संतापाचे वातावरण आहे आणि टीम इंडियाचे खेळाडूही चीनच्या आक्रमणावर भडकले आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे कर्नल संतोष बाबू शहीद झाले आहेत. वीरेंद्र सहवागपासून (Virender Sehwag) शिखर धवन (Shikhar Dhawan) पर्यंत, लडाखमध्ये झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी क्रिकेट बंधू एकत्र आले. माजी भारतीय क्रिकेटपटू सहवागने इन्स्टाग्रामवर त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. याशिवाय, हरभजन सिंहने चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे म्हटले. (India-China Face-off in Ladakh: अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूड कलाकारांनी शहीदांसाठी अर्पण केली श्रद्धांजली!)

सहवागने संतोष बाबूंचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, 'गल्वान खोऱ्यात आपल्या कृतीतून सर्वोच्च बलिदान देणाऱ्या कर्नल संतोष बाबूबद्दल मनापासून संवेदना. यावेळी जेव्हा जगाला महामारीचा सामना करावा लागतो तेव्हा ही आपल्याला शेवटची गोष्ट हवी होती. मी आशा करतो की चीनी सुधारेल."

धवननेही श्रद्धांजली वाहिली आणि सांगितले की बलिदान विसरले जाणार नाही.

'गलवान व्हॅलीमध्ये आपला जीव गमावलेल्या भारतीय सैन्याच्या जवानांबद्दल आम्ही नेहमी ऋणी राहू...' इरफान पठाणने लिहिले.

'सर्व चिनी उत्पादनांवर बंदी घाला', हरभजन म्हणाला.

दरम्यान, न्यूज एजन्सी ANI नेही सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय बाजूने ऐकलेल्या इंटरसेप्टवरून असे दिसून आले आहे की लडाखच्या गालवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत चीनचे कमीतकमी 43 सैनिकांचा मृत्यू झाला आहे किंवा ते गंभीर जखमी आहेत. भारतीय सैन्याबरोबर झालेल्या हिंसक चकमकीत सैनिक मारले गेले आणि गंभीर जखमी झालेल्या सैनिकांना नेण्यासाठी चीनकडून LAC वर हेलिकॉप्टरच्या हालचाली वाढल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2020 09:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).