India-China Face-off in Ladakh: अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूड कलाकारांनी शहीदांसाठी अर्पण केली श्रद्धांजली!
अमिताभ बच्चन, अक्षय कुमार (Image Credit: Instagram)

लद्दाख (Ladakh) मध्ये भारतीय लष्कर (Indian Soldiers) आणि चीनी सैन्यामध्ये हिंसक झडप झाल्याने मागील 2 दिवसात भारताचे सुमारे 20 जवान शहीद झाले आहेत. यामुळे भारत-चीन संबंध अधिक तणावाचे झाले आहेत. भारतीयांसाठी दु:खद असलेल्या या घटनेचा सार्‍याच स्तरामधून निषेध केला जात आहे. अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत तर बॉलिवूड सेलिब्रिटी देखील आपल्या मनातील भावना सोशल मीडीयामध्ये व्यक्त करत आहे. अनेक कलाकारांनी शहीद जवानांच्या परिवारासाठी प्रार्थना केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करताना ‘ज़रा आंख में भर लो पानी ; जो शहीद हुए हैं उनकी , ज़रा याद करो क़ुर्बानी. ..' या ओळी लिहून आपल्या मनातील शहीदांबद्दलच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

अमिताभ बच्चन यांचं ट्वीट

बिग बींप्रमाणेच अक्षय कुमारने देखील ट्वीटरच्या माध्यमातून या हिंसक झटापटीमध्ये शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्यासोबत 2 जवानांचा फोटो शेअर करत त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली अर्पण केली आहे. यासोबतच अक्षय कुमारने शहीदांच्या कुटुंबासाठी आपलं दु:ख व्यक्त केले आहे.

अक्षय कुमार याचं ट्वीट  

सोनू सूद  

काल दुपारी पहिल्यांदा समोर आलेल्या माहितीनुसार, चीनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक झटापटीमध्ये 3 जण शहीद झाले यामध्ये कर्नल संतोष बाबू झारखंड मधील कुंदन ओझा आणि हवलदार पलानी यांचा समावेश होता.