India-China Clash: भारताच्या शाहिद जवानांवरील CSK डॉक्टराची वादग्रस्त पोस्ट व्हायरल, फ्रँचायझीकडून त्वरित निलंबनाची कारवाई (पाहा Tweet)
चेन्नई सुपर किंग्ज (Photo Credit: Getty Images)

पूर्व लडाखमध्ये (Ladakh) चिनी सैन्याशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य (Indian Army) दलाच्या 20 जवानांच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या ट्विट प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) आपले टीम डॉक्टर मधु थोट्प्पिलील (Dr. Madhu Thottappillil) यांना पोस्टवरून निलंबित केले. मधू यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून भारतीय जवानांच्या मृदेहावरून वादग्रस्त ट्विट केले होते. सीएसकेने (CSK) आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर निलंबनाची घोषणा केली. भारत आणि चीनच्या जवानांमध्ये 15 आणि 16 जून दरम्यान गलवान खोऱ्यात जोरदार चकमक झाली ज्यात भारताचे 20 जवान शाहीत झाले. भारतीय सूत्रांनुसार43 जावं शाहिद झाले, तर तितकेच गंभीर जखमी झाल्याचं वृत्त समोर आले. मधू यांनी ट्विट केलं की, "शाहिद जवानांची शव पेटी PM Cares चे स्टिकर्स लावून येतात का?" चेन्नईने त्वरित मधू यांच्या ट्विटची दाखल घेतली आणि त्यांची हकालपट्टी केली. (India-China Clash: विराट कोहली, रोहित शर्माकडून भारतीय सैन्यातील शहिदांना श्रद्धांजली; सीमेचे रक्षण करणाऱ्या खऱ्या नायकांना केला सलाम)

"डॉ. मधु थोटप्पापिलिल यांच्या वैयक्तिक ट्विटची चेन्नई सुपर किंग्ज मॅनेजमेंटला माहिती नव्हती. टीम डॉक्टर म्हणून त्यांच्या पदावरून निलंबित त्यांना करण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आपल्या ट्विटवर खेद व्यक्त करते जे मॅनेजमेंटची माहिती नसताना केला आणि वाईट वृत्तीचा होता."

मंगळवारी गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारतीय जावं जखमी झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर थोताप्पिल यांनी एक ट्वीट केले असून सरकारची खिल्ली उडविली. नंतर त्यांनी ट्विट डिलीट केले आपले अकाउंट सुरक्षित केले. सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत भारताच्या शाहिद 20 जवानांमध्ये एका कर्नलचा समावेश होता. नाथू ला येथे 1967 मध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही सैन्यदलांमधील हा सर्वात मोठा संघर्ष होता. त्यावेळी भारताचे अंदाजे 80 सैनिक तर 300 हून अधिक चिनी सैन्य जवान शहीद झाले होते.