ICC CWC Super League Points Table: वर्ल्ड कप सुपर लीग गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, टीम इंडियाचही उघडलं खातं
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 3rd वनडे (Photo Credit: PTI)

ICC CWC Super League Points Table: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने (India Tour of Australia) अखेर पहिला विजय नोंदवला. कॅनबेराच्या (Canberra) मनुका ओव्हल (Manuka Oval) येथे नुकत्याच संपुष्टात आलेल्या मालिकेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर 13 धावांनी विजय मिळवला. यासह आयसीसी पुरुषांच्या वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेत (World Cup Super League Points) टीम इंडियाने आपलं खातं उघडलं. वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये (World Cup Super League) ऑस्ट्रेलियाने आजवर 6 सामने खेळले असून 4 मॅचमध्ये त्यांनी विजय मिळवला तर 2 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आयसीसी सुपर लीगच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाने 40 गुण मिळवून अव्वल स्थान कायम ठेवले आहे. इंग्लंडने संघाने देखील 6 सामने खेळले असून प्रत्येकी 3 सामने जिंकत तितक्याच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. इंग्लंड 30 गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहेत. शिवाय, टीम इंडियाने आपलं खातं उघडलं असून त्यांनी 3 पैकी 1 सामना जिंकला आहे. भारतीय संघाच्या खात्यात 9 गुण असून ते सहाव्या स्थानावर आहेत. (IND vs AUS 3rd ODI Stats: हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांची विक्रमी भागीदारी, कॅप्टन विराट कोहलीवर ओढवली ही नामुष्की, पाहा कॅनबेरामध्ये बनलेले रेकॉर्डस्)

इंग्लंड संघाने वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये प्रथम आपली मोहीम सुरू केली होती. वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये पाकिस्तानचा संघ 20 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे तर झिम्बाब्वे आणि आयर्लंड प्रत्येकी एका विजयासह चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. दरम्यान, 2023 वर्ल्ड कपसाठी वर्ल्ड कप सुपर लीग खूप महत्वाची आहे. तथापि, टीम इंडियासाठी ही लीग काही फरक पडत नाही कारण 2023 एकदिवसीय विश्वचषक भारतीय भूमीवर होत आहे, त्यामुळे यजमान म्हणून टीम इंडियाला थेट प्रवेश मिळणार आहे. वर्ल्ड कप सुपर लीगच्या पहिल्या 7 संघांना 2023 वनडे विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळेल. विश्वचषक सुपर लीगमध्ये सामना जिंकणे आपल्याला 10 गुण देते तथापि, वर्ल्ड कप सुपर लीग दरम्यान खेळल्या जाणार्‍या मालिकेत जास्तीत जास्त तीन सामन्यांचे गुण मोजले जातील.

दुसरीकडे, वनडे मालिकेनंतर टीम इंडिया आणि कांगारू संघात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. 4 नोव्हेंबर रोजी पहिला सामना कॅनबेरा येथे खेळला जाईल. त्यानंतर दोन्ही देशात 17 डिसेंबरपासून चार सामन्यांची बहुप्रतीक्षित कसोटी मालिका खेळली जाणार आहे.