IND vs BAN T20 WC 2024 Super 8 Stats And Record Preview: भारत आणि बांगलादेश यांच्यात आज होणार चुरशीची लढत, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
IND vs BAN (Photo Credit - X)

IND vs BAN T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषक सुपर 8 मध्ये (T20 World Cup 2024) भारतीय संघाचा दुसरा सामना आज बांगलादेशसोबत (IND vs BAN) होणार आहे. हा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर रात्री 8 वाजल्यापासून खेळला जाईल. त्याआधी भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव (IND Beat AFG) करुन विजयी सलामी दिली आहे. यासोबत भारतीय संघाने उपांत्य फेरीसाठी पुढील वाट सोपी केली आहे. या विजयानंतर भारतीय संघ ग्रुप-1 मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. आता आतापर्यत भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही आहे. तर, दुसरीकडे बांगलादेशची सुपर 8 मध्ये सुरुवात खुप वाईट झाली आहे. शुक्रवारी ऑस्टेलियाने पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा डीएलस नियमाच्या अधारे 28 धावांनी पराभव केला आहे.

आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व

टी-20 सामन्यात भारत आणि बांगलादेश आतापर्यत 13 वेळा आमनेसामने आले आहे. यामध्ये भारताने 12 वेळा विजय मिळवला आहे तर बांगलादेशने फक्त एकदाच विजयाची चव चाखली आहे. त्यामुळे, शनिवारी होणाऱ्या सामन्यात भारताचे वर्चस्व दिसत आहे. पण तरीही भारतीय संघाने बांगलादेशला हलक्यात घेणे सोपे ठरणार नाही. कारण, बांगलादेश अटीतटीच्या सामन्यात उलेटफेर करण्यात माहीर आहे, त्यामुळे भारतीय संघाला सावध राहावे लागेल. (हे देखील वाचा: IND vs BAN, 47rd Match Super 8: भारत आणि बांंगलादेश यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, 'या' दिग्गज खेळाडूंमध्ये होणार चुरशीची लढत)

आजच्या सामन्यात होऊ शकतात हे मोठे विक्रम 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी सहा षटकारांची गरज आहे.

बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 बळींचा टप्पा गाठण्यासाठी दोन विकेट्सची गरज आहे.

बांगलादेशचा स्टार फलंदाज लिटन दासला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 झेल पूर्ण करण्यासाठी दोन झेल आवश्यक आहेत.

टीम इंडियाचा घातक फलंदाज विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी पाच षटकारांची गरज आहे.

बांगलादेशचा स्टार गोलंदाज शरीफुल इस्लामला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 बळींचा टप्पा गाठण्यासाठी आणखी चार विकेट्सची गरज आहे.

टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज युजवेंद्र चहलला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 बळींचा टप्पा गाठण्यासाठी आणखी चार विकेट्सची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला 300 षटकार पूर्ण करण्यासाठी दोन षटकारांची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला 250 षटकार पूर्ण करण्यासाठी आठ षटकारांची गरज आहे.

टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू शिवम दुबेला टी-20 क्रिकेटमध्ये 50 बळींचा टप्पा गाठण्यासाठी आणखी चार विकेट्सची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये बांगलादेशचा महान फलंदाज तनजीद हसनला 50 षटकार पूर्ण करण्यासाठी तीन षटकारांची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये बांगलादेशचा महान फलंदाज लिटन दासला 200 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी नऊ षटकारांची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये बांगलादेशचा अनुभवी फलंदाज सौम्या सरकारला 150 चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी नऊ चौकारांची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये बांगलादेशचा महान फलंदाज सौम्या सरकारला 150 षटकार पूर्ण करण्यासाठी चार षटकारांची गरज आहे.