IND vs BAN, 47rd Match Super 8: भारत आणि बांंगलादेश यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, 'या' दिग्गज खेळाडूंमध्ये होणार चुरशीची लढत
IND vs BAN (Photo Credit - X)

IND vs BAN T20 WC 2024 Super 8: भारतीय क्रिकेट संघ 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2024) आतापर्यंत अपराजित राहिला आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुपर-8 मध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाने येथेही अफगाणिस्तानविरुद्ध विजयी मोहीम सुरू ठेवली. आता भारताचा सामना आज रात्री बांगलादेशशी (IND vs AFG) होणार आहे. हा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. हा सामना आज रात्री भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण, भारताने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत जवळपास प्रवेश करेल. (हे देखील वाचा: IND vs BAN सामन्यापूर्वी PM Narendra Modi यांनी दोन्ही संघांना दिल्या शुभेच्छा; जाणून घ्या काय म्हणाले ते (Watch Video)

'या' दिग्गज खेळाडूंमध्ये होणार चुरशीची लढत

रोहित शर्मा विरुद्ध तंजीम हसन साकिब

टीम इंडियाचा कर्णधार आणि ओपनिंग बॅट्समन रोहित शर्माला आयर्लंडविरुद्धच्या ग्रुप मॅचमध्ये अर्धशतक झळकावल्यानंतरही विशेष काही करता आलेलं नाही. आजच्या सामन्यात रोहित शर्माला मोठी खेळी खेळावी लागणार आहे, कारण बांगलादेशचे गोलंदाज कधीही सामन्याचा मार्ग बदलू शकतात. दुसरीकडे बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज तनझिम हसन साकिब सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये तनझीम हसन शाकिब रोहित शर्मासाठी मोठा धोका बनू शकतो.

विराट कोहली विरुद्ध मुस्तफिजुर रहमान

टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन विराट कोहली या टी-20 वर्ल्ड कपमध्ये काही खास करू शकला नाही. मात्र अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने 24 चेंडूत 24 धावांची संथ खेळी केली. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध विराट कोहलीची कामगिरी फारशी चांगली नाही. अशा परिस्थितीत बांगलादेशचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान हा विराट कोहलीसमोर सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. आजच्या सामन्यात मुस्तफिजुर रहमान नक्कीच विराट कोहलीची मोठी विकेट घेण्याचा प्रयत्न करेल.

सूर्यकुमार यादव विरुद्ध रिशाद हुसेन

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव गेल्या दोन डावांत जबरदस्त फलंदाजी करताना दिसला. सूर्यकुमार यादवने शेवटच्या दोन डावात अर्धशतके झळकावून संघाला शानदार विजय मिळवून दिला. आजच्या सामन्यातही सूर्यकुमार यादवला अशीच कामगिरी करून संघाला विजय मिळवून द्यायला आवडेल. बांगलादेशचा फिरकीपटू रिशाद हुसेनविरुद्ध सूर्यकुमार यादवची मधल्या षटकांमध्ये कामगिरी पाहण्यासारखी असेल. रिशाद हुसेनने या विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली असून 5 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत.

लिटन दास विरुद्ध जसप्रीत बुमराह

सलामीवीर लिटन दास हा बांगलादेश संघातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. आजच्या सामन्यात लिटन दासची मोठी विकेट असेल. लिटनची विश्वचषकात चांगली कामगिरी झाली नसली तरी या सामन्यात लिटन दासला मोठी खेळी खेळायला आवडेल. पण पॉवरप्लेमध्ये लिटन दासचा सामना जसप्रीत बुमराहशी होईल, जो या टी-20 विश्वचषकात वेगळ्या शैलीत गोलंदाजी करताना दिसत आहे. जसप्रीत बुमराह पॉवरप्लेमध्ये लिटन दास आणि इतर फलंदाजांच्या विकेट घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.

नजमुल हुसेन शांतो विरुद्ध कुलदीप यादव

बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने मागील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 41 धावांची खेळी केली होती. नझमुल हुसेन शांतो फलंदाजी करताना चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, मात्र त्याला फिरकी गोलंदाज ॲडम झम्पाने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कर्णधार नजमुल हुसेन शांतो या सामन्यात मोठी खेळी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल, मात्र कुलदीप यादव त्याच्याविरुद्ध जीवघेणा ठरू शकतो. गेल्या सामन्यात कुलदीप यादवने या विश्वचषकात पहिला सामना खेळला आणि 2 बळी घेतले.