IND vs BAN सामन्यापूर्वी PM Narendra Modi यांनी दोन्ही संघांना दिल्या शुभेच्छा; जाणून घ्या काय म्हणाले ते (Watch Video)
दोघांमधील हा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. स्थानिक वेळेनुसार हा सामना सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. तर, भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामना सुरू होईल.
IND vs BAN T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024), आज म्हणजेच शनिवार, 22 जून रोजी, भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोघांमधील हा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. स्थानिक वेळेनुसार हा सामना सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. तर, भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामना सुरू होईल. या सामन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या आहे. पीएम मोदी म्हणाले, "मी आज संध्याकाळी क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना माझ्या शुभेच्छा देतो." पंतप्रधान पुढे म्हणाले की, "बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकास भागीदार आहे आणि आम्ही बांगलादेशसोबतच्या आमच्या संबंधांना सर्वोच्च प्राधान्य देतो."
पाहा व्हिडिओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2024 04:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

