अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Photo Credit: Twitter/BCCI)

India A vs Australia A 2nd Tour Match Live Streaming: भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) भारत-अ (India-A) आणि ऑस्ट्रेलिया-अ (Australia-A) संघातील तीन दिवसीय दुसरा सराव सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघातील पहिला सामना अनिर्णित राहिला होता, पण दोन्ही संघांकडून काही खेळाडूंनी प्रभावी कामगिरी बजावली होती. अजिंक्य रहाणे आणि कॅमरून ग्रीनने शतके झळकावली तर उमेश यादव आणि मार्क स्टिकेटी, दोघांनी चेंडूने चमकदार कामगिरी केली. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील दुसरा सराव सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरु होईल. सोनी पिक्चर्स नेटवर्क 2020-21 भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे अधिकृत अधिकृत प्रसारक असल्याने भारतीय प्रेक्षक हा सामना Sony Six आणि Sony Six HD चॅनेलवर लाईव्ह पाहू शकतात. शिवाय, या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग SonyLiv अ‍ॅप उपलब्ध असेल. (IND vs AUS Test 2020: चेंडू हेल्मेटवर आदळल्याने Will Pucovski जायबंदी; पहिल्या टेस्ट सामन्यात सलामीला उतरण्याबाबत अनिश्चितता)

दरम्यान, आपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात काही खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो तर दोन्ही संघात कसोटी संघातील काही नियमित खेळाडूंचाही समावेश होऊ शकतो. पहिल्या सराव सामन्यात अजिंक्य रहाणेने भारताचे नेतृत्व केले होते. लक्षात घेण्यासारखे म्हणजे हा सामना दिवस/रात्र सामना असून गुलाबी चेंडूने खेळला जाईल. भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा गुलाबी चेंडूने खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय संघ टी-20 मालिकेच्या विजयी लयीसह मालिकेत प्रवेश करू पाहत असेल. दुसऱ्या सामन्यात देखील रहाणे भारताचे नेतृत्व करत आहे, तर अ‍ॅलेक्स कॅरी याच्याकडे ऑस्ट्रेलिया-अ संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पाहा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ

भारतः विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , नवदीप सैनी, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर).

ऑस्ट्रेलिया: सीन एबॉट, जो बर्न्स, अ‍ॅलेक्स कॅरी (कॅप्टन, विकेटकीपर), हॅरी कॉनवे, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, निक मॅडिनसन, बेन मॅकडर्मोट, मार्क स्टिकेटी, विल सदरलँड, मिचेल स्वीपसन, जॅक वाइल्डर्मथ.