टीम इंडिया अ (Photo Credits: Twitter)

India A National Cricket Team vs Pakistan A National Cricket Team 4th Match Scorecard:  ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया कप 2024 ( ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024) चा चौथा सामना आज म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी भारतीय अ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान अ राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांमधला हा सामना अल अमेरत क्रिकेट ग्राउंड, मिनिस्ट्री टर्फ 1 वर खेळला जात आहे. या स्पर्धेत टीम इंडिया अ ची कमान टिळक वर्मा यांच्या खांद्यावर आहे. तर, पाकिस्तान अ संघाचे नेतृत्व मोहम्मद हरिस करत आहे.

दरम्यान, स्पर्धेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार तिलक वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडिया अ संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीरांनी शानदार फलंदाजी करत अवघ्या 37 चेंडूत 68 धावा केल्या.  ( हेही पाहा - India A vs Pakistan A T20 Emerging Teams Asia Cup 2024 1st Inning Scorecard: टीम इंडिया अ ने पाकिस्तान अ संघाला दिले 184 धावांचे लक्ष्य, टिळक वर्माने खेळली कॅप्टन इनिंग्स; पहा पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड )

पाहा पोस्ट -

टीम इंडिया अ ने 20 षटकात 8 विकेट गमावून 183 धावा केल्या. या स्फोटक खेळीदरम्यान टिळक वर्माने 35 चेंडूंचा सामना करत दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. टिळक वर्माशिवाय प्रभासिमरन सिंगने 36 धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने 19 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकार ठोकले.

सुफियान मुकीमने पाकिस्तान अ संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पाकिस्तान अ संघाकडून सुफियान मुकीमने सर्वाधिक दोन बळी घेतले. सुफियान मुकीमशिवाय मोहम्मद इम्रान, जमान खान, अराफत मिन्हास आणि कासिम अक्रम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान अ संघाला 20 षटकात 184 धावा करायच्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान अ संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाचे दोन फलंदाज अवघ्या 21 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर यासिर खान आणि कासिम अक्रम यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली. पाकिस्तान अ संघाला षटकात सात गडी गमावून केवळ 176 धावा करता आल्या. पाकिस्तान अ संघाकडून अराफत मिन्हासने 41 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. अराफत मिन्हासशिवाय यासिर खानने 33 धावा केल्या.

अंशुल कंबोजने टीम इंडिया अ ला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडिया अकडून अंशुल कंबोजने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. अंशुल कंबोजशिवाय रसिक दार सलाम आणि निशांत सिंधूने प्रत्येकी दोन गडी बाद केले. टीम इंडियाचा पुढील सामना सोमवारी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध होणार आहे.