India A National Cricket Team vs Pakistan A National Cricket Team 4th Match Scorecard:   ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया कप 2024 ( ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024) चा चौथा सामना आज म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी भारतीय अ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान अ राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांमधला हा सामना अल अमेरत क्रिकेट ग्राउंड, मिनिस्ट्री टर्फ 1 वर खेळला जात आहे. या स्पर्धेत टीम इंडिया अ ची कमान टिळक वर्मा यांच्या खांद्यावर आहे. तर, पाकिस्तान अ संघाचे नेतृत्व मोहम्मद हरिस करत आहे. गेल्या वेळी इमर्जिंग आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय अ संघाला पाकिस्तानविरुद्ध 128 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.  (हेही वाचा  -  India vs New Zealand 1st Test Day 4 Stumps Scorecard: टीम इंडियाचा दुसरा डाव 462 धावांवर आटोपला, सरफराज खान आणि ऋषभ पंतची स्फोटक खेळी, न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांची गरज; पहा स्कोअरकार्ड )

दरम्यान, स्पर्धेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार तिलक वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडिया अ संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीरांनी शानदार फलंदाजी करत अवघ्या 37 चेंडूत 68 धावा केल्या.

पाहा पोस्ट -

टीम इंडिया अ ने 20 षटकात 8 विकेट गमावून 183 धावा केल्या. या स्फोटक खेळीदरम्यान टिळक वर्माने 35 चेंडूंचा सामना करत दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. टिळक वर्माशिवाय प्रभासिमरन सिंगने 36 धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने 19 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकार ठोकले.

सुफियान मुकीमने पाकिस्तान अ संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पाकिस्तान अ संघाकडून सुफियान मुकीमने सर्वाधिक दोन बळी घेतले. सुफियान मुकीमशिवाय मोहम्मद इम्रान, जमान खान, अराफत मिन्हास आणि कासिम अक्रम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान अ संघाला 20 षटकात 184 धावा करायच्या आहेत. टीम इंडियाला हा सामना जिंकून मागील फायनलचा बदला घ्यायचा आहे.