IND-W vs SA-W 3rd ODI: लखनौ (Lucknow) येथील एकाना स्टेडियमवर नुकत्याच संपुष्टात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाला (India Womens' Team) दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने सहा धावांनी (डकवर्थ / लुईस) पराभव केला आहे. यासह, पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर (Ekana Stadium) खेळलेल्या तिसऱ्या सामन्यात पहिले फलंदाजी करत यजमान भारतीय संघाने पाच विकेट गमावून 248 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने 46.3 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 223 धावा केल्या. आफ्रिकी संघाला विजयासाठी अखेरच्या 21 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता होती, परंतु त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आणि काही काळानंतर डकवर्थ लुईस नियमांतर्गत संघाला विजयी घोषित करण्यात आले. (IND-W vs SA-W 2nd ODI: स्मृती मंधानाच्या धमाकेदार खेळीने रचला इतिहास, वनडे क्रिकेटमध्ये अशी आश्चर्यकारक कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली क्रिकेटर)
पाहुण्या संघासाठी सलामी फलंदाज लीझल लीने नाबाद (Lizelle Lee) 132 धावांची सर्वात मोठी खेळी केली तर मिगनॉन डू प्रीझने 37 धावा केल्या. भारतासाठी अनुभवी झूलन गोस्वामी दोन विकेट्स घेतल्या. भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे तर पूनम राऊतने संघासाठी सर्वाधिक 77 धावा केल्या. शिवाय कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 36 धावांचे योगदान दिले. दरम्यान, लीझल ली हिला तिच्या झुंजार शामभरी कामगिरीबद्दल सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तत्पूर्वी, 38-वर्षीय मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आणि ही कामगिरी करणार्या भारताची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. तिच्यापूर्वी इंग्लंडच्या शार्लेट एडवर्ड्सने ही कामगिरी केली आहे. मितालीने 35 धावा करताच 10,000 धावांचा टप्पा सर केला आणि सामन्यात वैयक्तिक 36 धावांवर कॅच आऊट होऊन माघारी परतली.
South Africa win by the DLS method!
Lizelle Lee's third ODI century helped the visitors take a 2-1 lead in the series, with rain forcing abandonment with South Africa ahead. #INDvSA pic.twitter.com/gGSvTUd8Q8
— ICC (@ICC) March 12, 2021
यजमान टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत 64 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या ज्यानंतर मिताली आणि राऊतने मिळून डाव सांभाळला. मिताली राजने तिच्या खेळीदरम्यान पाच चौकार लगावले. लीझल लीच्या शतकी खेळीने पूनम राऊत आणि मितालीच्या डावावर पाणी फेरले. पाच सामन्यांच्या मालिकेचा चौथा सामना 14 मार्च रोजी खेळला जाईल.