स्मृती मंधाना (Photo Credit: Twitter/BCCIWomen)

IND-W vs SA-W 2nd ODI: भारतीय महिला क्रिकेट संघाची (India Women's Cricket Team) सलामी फलंदाज स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) मंगळवार, 9 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (South Africa) दुसर्‍या वनडे सामन्यात फलंदाज अर्धशतक झळकावत इतिहास रचला आहे. मंधानाने 10 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 64 चेंडूत नाबाद 80 धावा फटकावल्या. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील लक्ष्याचा पाठलाग करताना मंधाना सलग 10 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावसंख्या पार करणारी जगातील पहिली क्रिकेटपटू (पुरुष / महिला) बनली आहे. 2018 पासून स्मृतीने लक्ष्याचा पाठलाग करत सलग 10 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, पुरुष क्रिकेटमध्ये सचिन, विराट, रोहित, वॉर्नर यांसारख्या कोणत्याही खेळाडूने 6 पेक्षा जास्त वेळा हा पराक्रम करता आला नसून स्मृतीने पहिला मान पटकावला आहे. इतकंच नाही तर भारताकडून (India) सलामी फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करणार स्मृती आघाडीची ओपनर ठरली आहे. मंधानाने 2094 धावा केल्या असून 72 सामन्यांत 2039 धावा करणाऱ्या जया शर्माला मागे टाकले. पुनम राऊत 54 सामन्यांतून 1657 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. (IND-W vs SA-W 2nd ODI: झुलन गोस्वामीचा भेदक मारा, स्मृती मंधानाच्या अर्धशतकाने टीम इंडिया 9 विकेटने विजयी, दक्षिण आफ्रिकेची उडवली दाणादाण)

2018 मध्ये स्मृतीने वडोदरा येथे ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध सर्वप्रथम 53 चेंडूत 67 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर, मंधानाने 52, 86, नाबाद 53, नाबाद 73, 105, नाबाद 90, 63, 74 आणि नाबाद 80 अशा धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेला निराशाजनक सुरुवात झालेल्या सामन्यात मंधानाने 20 चेंडूत 14 धावांच केल्या होत्या. तथापि, तिने दुसर्‍या सामन्यात सर्वोत्तम खेळी केली आणि 64 धावांनी 80 धावा फटकावत भारताला मोठा विजय मिळवून दिला. रायपूरच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या संघाची अनुभवी ज्येष्ठ वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने कहर केला आणि यजमान भारतीय संघाने आफ्रिकी महिला संघाला 41 ओव्हरमध्ये 157 धावांवर रोखलं. राजेश्वरी गायकवाडने तीन गडी बाद केले तर मानसी जोशीला दोन विकेट मिळाल्या. पाहुण्यांसाठी लारा गुडॉलने 49 तर कर्णधार सुने लुसने 36 धावा केल्या.

ओपनर म्हणून सर्वाधिक धावा

प्रत्युत्तरात, भारताकडून जेमिमाह रॉड्रिगसची एकमेव विकेट गमावली. जेमिमाहला 9 धावांवर शबनीम इस्माईलने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पण मंधानाने पुनम राऊतसह शतकी भागीदारी करत फक्त 28.4 ओव्हरमध्ये संघाला विजयीरेष ओलांडून दिली. मंधानाशिवाय पूनम राऊतने 89 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 62 धावा फटकावल्या.