India-W vs South Africa-W 2nd ODI: भारतीय महिला क्रिकेट संघाने (India Women's Cricket Team) दुसर्‍या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव धुव्वा उडवला आणि 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) आणि स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांनी भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलनने 4 विकेट घेतल्या तर मंधानाने नाबाद 80 धावांची खेळी केली. भारत रत्न अटल विहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर (Ekana Stadium) झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात मंधाना आणि पूनम राऊत (Poonam Raut) यांच्यातील 138 विकेटच्या भागीदारीने संघाला दुसऱ्या सामन्यात विजयीरेष ओलांडून दिली. राऊतने नाबाद 62 धावांची खेळी करत मंधानाला चांगली साथ दिली. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली आणि 41 ओव्हरमध्ये 157 धावांवरच ढेर झाली. (IND-W vs SA-W 2nd ODI: स्मृती मंधानाच्या धमाकेदार खेळीने रचला इतिहास, वनडे क्रिकेटमध्ये अशी आश्चर्यकारक कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली क्रिकेटर)

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघासाठी मंधानाने 64 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारासह नाबाद 80 आणि राऊतच्या 89 चेंडूत आठ चौकारांसह नाबाद 62 धावा करत संघाला 28.4 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून 160 धावा केल्या आणि सामना जिंकवून दिला. भारतीय संघाने शॉर्ट रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू केला आणि सलामी फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स नऊ धावा करून शबनीम इस्माईलच्या चेंडूवर पॅव्हिलियनमध्ये परतली. यानंतर मंधाना आणि राऊत यांनी डाव हाताळला आणि आपल्या भागीदारीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेकडून इस्माईलने 46 धावा देत एक विकेट घेतली. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा डाव झूलन गोस्वामीच्या भेदक माऱ्यापुढे कोसळला आणि त्याला जास्त धावसंख्या करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून लारा गुडॉलने 77 डूंत दोन चौकारांच्या मदतीने 49 धावा केल्या.

शिवाय, कर्णधार सूने लुसने 36, त्रिशा चेट्टीने 12, मिग्लन डू प्रसेने 11 आणि मेरीझान कॅपने 10 धावा केल्या. अयाबोंगा खाका पाच धावा करून नाबाद परतली. टीम इंडियासाठी झुलन वगळता राजेश्वरी गायकवाडने तीन, मानसी जोशीने दोन आणि हरमनप्रित कौरने एक गडी बाद केला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमधील मालिकेचा तिसरा सामना शुक्रवारी याच मैदानावर खेळला जाईल.