टीम इंडियाची (Team India) धाकड महिला सलामी फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) तिच्या आक्रमक ब्रँड क्रिकेटच्या यशाचा मंत्र उलगडला आहे. टी-20 क्रिकेटनंतर कसोटी क्रिकेटमध्येही आपली फलंदाजीची शक्ती दाखविली. ब्रिस्टल (Bristol)येथे खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध पदार्पण करत 17 वर्षीय शेफालीने 96 धावांचा शानदार डाव खेळला. चार धावांनी तिचे शतक हुकले पण तिने आपल्या नावावर अनेक विक्रम नोंदवले. कसोटी सामन्यात सर्वात मोठा डाव खेळणारी शेफाली ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यानंतर आपल्या आक्रमक खेळीच्या यशाचा मंत्र प्रकट करत वर्मा म्हणाली की, मोठी होत असताना ती आणि तिच्या भावासोबत "षटकार मारण्याची स्पर्धा" खेळायचे, आणि तिचे वडील ज्याने अधिक षटकारले त्याला 10-15 रुपये पुरस्कार द्यायचे. (IND W vs ENG W Test 2021 Day 2: स्मृती मांधना आणि शेफाली वर्माची जबरदस्त फलंदाजी, पण दिवसाअखेर इंग्लंडच्या गोलंदाजाची दिसली जादू)
2019 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या शेफालीला मर्यादित ओव्हरमधील कामगिरीच्या जोरावर कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड दौऱ्यावर संधी मिळाली आहे. शेफालीच्या मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेची एक छोटी क्लिप भारतीय क्रिकेट टीमच्या अधिकृत ट्विटर हँडलने शेअर केली. "षटकार मारण्याची स्पर्धा? आता आम्हाला माहित आहे की ते मोठे हिट्स कोठून येतात," बीसीसीआयने व्हिडिओल कॅप्शन दिले. इंग्लंडविरुद्ध ब्रिस्टल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शेफालीने भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये प्रवेश केला. तिने 152 चेंडूत 96 धावा फटकावल्या, ज्यात 13 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
A six-hitting competition? 😲
Now we know where those big hits come from 😉💥#TeamIndia #ENGvIND @TheShafaliVerma pic.twitter.com/8Byi3qoRCk
— BCCI Women (@BCCIWomen) June 17, 2021
इंग्लंडच्या पहिल्या डावातील 396/9 धावसंख्येच्या प्रत्युत्तरात शेफालीने इलिगंट सलामी जोडादार स्मृती मंधाना समवेत भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी रचली आणि या प्रक्रियेमध्ये कसोटी क्रिकेटमधील भारतीय महिला संघासाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम रचला. त्यांच्या खेळी अगोदर गार्गी बॅनर्जी आणि संध्या अग्रवाल यांनी हा विक्रम केला. दोघींनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1984 मध्ये 153 धावांची सलामी भागीदारी केली होती. ब्रिटिश गोलंदाज केट क्रॉसच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शेफाली झेलबाद झाली आणि तिचे पहिले कसोटी शतक फक्त चार धावांनी हुकले ज्याची निराशा युवा फलंदाजाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती.