मेग लॅनिंग आणि मिताली राज (Photo Credit: Twitter/ICC)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia Tour) एकदिवसीय मालिका 2-1 ने गमावल्यावर मिताली राजचा  (Mithali Raj) भारतीय संघ (Indian Team) आता पहिल्या पिंक-बॉल कसोटी सामन्यासाठी सज्ज होत आहे. क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल (Carrara Oval) येथे खेळला जाणारा हा ऐतिहासिक सामना ऑस्ट्रेलिया (Australia Women) आणि भारतीय महिला (India Women) यांच्यातील 15 वर्षांतील पहिला कसोटी सामना असेल. ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर 2017 मध्ये एकमेव दिवस-रात्र कसोटी (D/N Test) सामना खेळला होता तर भारतीय महिला संघासाठी हा पहिलाच अनुभव असणार आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्क भारतीय महिलांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे कव्हरेज सुरू ठेवेल. सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि सोनी सिक्स HD चॅनेलवर उपलब्ध असेल तसेच ऑन-डिमांड OTT प्लॅटफॉर्म, Sony Liv वर थेट-प्रसारित केले जाईल. भारतीय वेळेनुसार सकाळी 10:00 वाजता चाहते सामन्याचा आनंद लुटू शकतात. (AUS-W vs IND-W D/N Test 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक पिंक-बॉल कसोटीतून हरमनप्रीत कौर आऊट, भारत महिला संघाला मोठा धक्का)

भारताने सात वर्षांनंतर पहिल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली आणि जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर सामना अनिर्णित केला. पण खेळाडू आणि तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की गुलाबी-चेंडू पाहुण्या संघासाठी अधिक कठीण आव्हानात्मक ठरेल. भारत आणि ऑस्ट्रेलियाने 2006 मध्ये शेवटची कसोटी खेळली होती त्यामधील फक्त मिताली राज आणि झुलन गोस्वामी यंदाच्या संघाचा भाग आहेत. हरमनप्रीत कौर वनडेनंतर कसोटी मालिकेतूनही बाहेर राहील. त्यामुळे एकदिवसीय मालिकेत प्रभावी पदार्पण करणारी रुकी फलंदाज यस्तिका भाटिया आणि वेगवान गोलंदाज मेघना सिंह यांच्यापैकी एकीला पहिल्या कसोटी सामन्याची संधी दिली जाऊ शकते. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष आपली विजयी लय कायम ठेवण्यावर असेल.

भारतीय महिला टेस्ट टीम:

मिताली राज (कॅप्टन), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, पुनम राऊत, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शिखा पांडे, झुलन गोस्वामी, मेघना सिंह, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, रिचा घोष आणि एकता बिष्ट.

ऑस्ट्रेलिया महिला टेस्ट टीम:

मेग लॅनिंग (कॅप्टन), डार्सी ब्राउन, मैटलान ब्राउन, स्टेला कॅम्पबेल, निकोला कॅरी, हन्ना डार्लिंगटन, अ‍ॅशलेघ गार्डनर, एलिसा हेली (विकेटकीपरके), ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलीस पेरी, जॉर्जिया रेडमायन, मोली स्ट्रॅनो, अॅनाबेल सोनथर, जॉर्जिया वेअरहॅम.