विराट कोहली (Photo Credit: Twitter/BCCI)

वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्धच्या दुसर्‍या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजीत काही खास कामगिरी करू शकला नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने (India) अष्टपैलू शिवम दुवे याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 171 धावांचे लक्ष्य दिले होते. विंडीजने भारताने दिलेले आव्हान सहजतेने 18.3 ओव्हरमध्ये आणि 2 गडी गमावून गाठले. शिवम आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्या प्रभावी खेळी सोडून अन्य कोणताही भारतीय फलंदाज प्रभाव पाडू शकला नाही. विराटही फलंदाजीत काही कमाल करू शकला नाही आणि 19 धावांवर असताना केसरीक विल्यम्स याने त्याला लेंडल सिमंस याच्याकडे झेलबाद केले. तथापि, क्षेत्ररक्षण दरम्यान त्याने असा एक झेल पकडला ज्याने प्रेक्षक गॅलरीमधील विद्यमान प्रेक्षकही थक्क राहिले. कोहलीने रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या चेंडूवर 'सुपरमॅन' स्टाईलमध्ये अद्भुत झेल पकडला. (IND vs WI 2nd T20I: रोहित शर्मा ला पछाडत विराट कोहली बनला टी-20 चा बॉस, मोडला हिटमॅनचा विश्व रेकॉर्ड)

भारतीय डावाच्या 14 व्या षटकातील चौथ्या बॉलवर वेस्ट इंडिजकडून डोकादायक शिमरोन हेटमायर (Shimron Hetmyer) याला बाद करण्यासाठी कोहलीने शानदार झेल पकडला. यापूर्वी जडेजाच्या चेंडूवर हेटमेयरने सलग दोन षटकार ठोकले होते. तिसऱ्या चेंडूवर हेलमेयरने पुन्हा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण कोहलीने बाउंड्री लाईनवर झेल पकडला आणि हेटमेयरचा डाव संपुष्टात आणला. या खेळीत हेटमेयरने 14 चेंडूंचा सामना करत 23 धावा केल्या. यात त्याने एकूण तीन षटकार लगावले. याआधी तो भारतीय गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसला होता. पाहा कोहलीने पकडलेल्या कॅचचा हा थक्क करणारा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

CATCH IT 😲😲 SUPER V to the rescue 🙌🏻🙌🏻 #TeamIndia #INDvWI @paytm

A post shared by Team India (@indiancricketteam) on

कोहलीचा हा अप्रतिम कॅच पाहून नेटिझन्सही त्याचे कौतुक करत आहे.

सुपर वी !!

कॅच ऑफ द डे

ते आश्चर्यकारक होते!

हा झेल पुढील स्तराचा होता

काय कॅच पकडला आहे

दरम्यान, पहिल्या सामन्याप्रमाणेच या मॅचमध्येदेखील भारतीय खेळाडूंकडून खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. भुवनेश्वर कुमार याच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर आणि रिषभ पंत यांनी अनुक्रमे सिमंस आणि एव्हिन लुईस यांचे झेल सोडले.  भारतीय फिलिडर्सने सिमंस आणि लुईसचे झेल सोडले तेव्हा ते अनुक्रमे 6 आणि 16 धावांवर खेळत होते. खराब क्षेत्ररक्षण भारतीय संघाला महागात पडले. दुसरा सामना विंडीजने 8 विकेटने जिंकला आणि मालिकेत बरोबरी साधली.सिमंसने नाबाद 67 धावा केल्या.