वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावरील टीम इंडियाने चांगली कामगिरी केली असून टी-20 मालिकेच्या क्लिन स्वीपनंतर त्यांनी वनडे मालिका 2-0 ने जिंकली आहे. आणि आता गुरुवारी दोन्ही संघांमधील टेस्ट मालिकेला अँटिगामध्ये सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची काही विक्रमांवर नजर असेल. पण, त्याच्या व्यतिरिक्त अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील एक विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी तत्पर असेल. जडेजाने विश्वचषकमध्ये मिळालेल्या संधीचे सोनं करत प्रभावी खेळी केली. आणि त्याच्या आधारावर त्याची विंडीज दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. टी-20 आणि वनडे मालिकेसाठी जडेजाला संधी मिळाली नाही. पण, जर टेस्ट मालिकेतला त्याला संघात स्थान मिळाले तर तो आर. अश्विन (R Ashwin) सह गोलंदाजांच्या या एलिट यादीमध्ये सहभागी होऊ शकतो. (IND vs WI 1st Test: केएल राहुल याने शेअर केला समुद्रकिनाऱ्याजवळ बसलेला फोटो; क्रिकेटपटू नाही मॉडेल बन आता म्हणत Netizens ने व्यक्त केला संताप)
टेस्ट विकेटमध्ये 200 घेण्यापासून जडेजा अवघ्या आठ गडी दूर आहे, असे झाल्यास हा पराक्रम गाठणारा तो दहावा भारतीय गोलंदाज ठरेल. जर जडेजाने अँटिगामध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्ट सामन्यात त्याने हा उंबरठा पार केला तर अश्विननंतर 200 विकेट घेणारा दुसरा वेगवान भारतीय गोलंदाज बनण्याची त्याला संधी आहे. त्याने आतापर्यंत 192 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. सध्या जडेजा टेस्ट गोलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.
वेस्ट इंडिजमधील टी-20 आणि वनडे सामन्यात शानदार कामगिरीनंतर आता टीम इंडिया टेस्ट मालिकेत चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. विंडीजविरुद्ध मालिकेत टीम इंडिया टेस्ट रँकिंगचे पहिले स्थान कायम ठेवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.