IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 आणि ODI मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी
रोहित शर्मा (Photo Credit: Twitter)

दक्षिण आफ्रिका (SA) दौऱ्यानंतर, भारतीय संघ (IND) पुढील महिन्यापासून वेस्ट इंडिज (WI) सोबत तीन सामन्यांची एकदिवसीय आणि T20 मालिका खेळणार आहे. कॅरेबियन संघ येत्या काही दिवसांत भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे रोहित शर्मा आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो या स्पर्धेत टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे, तर केएल राहुल दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून उपलब्ध असेल. गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला रवींद्र जडेजा दोन्ही मालिकेतून बाहेर आहे, तर अक्षर पटेल टी-20 मालिकेत खेळणार नाही. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. एकदिवसीय सामने 6, 9 आणि 11 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जातील, तर T20 सामने 16, 18 आणि 20 फेब्रुवारीला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होतील.

वेस्ट इंडिज विरुद्ध भारतीय एकदिवसीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, वाय चहल, कुलदीप यादव, डब्ल्यू सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान. (हेही वाचा: SA vs NZ Test Series 2022: न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 17 सदस्यीय दक्षिण आफ्रिका संघ घोषित)

वेस्ट इंडिजविरुद्धचा भारताचा टी-20 संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, आवेश खान, हर्षल पटेल.