IND vs WI Series 2022: वेस्ट इंडिज (West Indies) विरोधात तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची (Indian Team) घोषणा करण्यात आली आहे. नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हॅमस्ट्रिंग दुखापतीतून बारा होऊन परतला आहे तर जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. विंडीज मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रवी बिश्नोईची (Ravi Bishnoi) पहिल्यांदाच टीम इंडियात (Team India) निवड झाली आहे. तर रवी सोबत आवेश खान, हर्षल पटेल (Harshal Patel) आणि दीपक हुडा (Deepak Hooda) यांनाही संघात स्थान मिळाले आहे. तसेच कुलदीप यादवचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे. कुलदीप आणि दीपक या दोन्ही खेळाडूंची केवळ एकदिवसीय संघात निवड करण्यात आली आहे. मायदेशात होणाऱ्या या मालिकेत युवा खेळाडूंकडून ‘कॅप्टन’ रोहित शर्मा कसे काम काढून घेतो याकडे सर्वामध्ये लक्ष लागून असेल. (IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 आणि ODI मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यासाठी बिश्नोई, दीपक हुडा, आवेश खान आणि हर्षल पटेल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्यांनी खूप प्रभावी ठरले आहेत. या सर्व खेळाडूंनी देशांतर्गत सामन्यांमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याच कारणामुळे त्याला टीम इंडियात स्थान देण्यात आले आहेत. बिश्नोईच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने ‘लिस्ट ए’च्या 17 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत. तर 42 टी-20 सामन्यात त्याचे नावे 49 विकेट्स आहेत. तर दीपक हुडा अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत दिसेल. त्याने ‘लिस्ट ए’ च्या 74 सामन्यात 2257 धावा, तर 46 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 2908 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 9 शतके झळकावली आहेत.
दुसरीकडे, कुलदीप बर्याच काळापासून संघातून बाहेर होता आणि गेल्या वर्षी त्याला श्रीलंकेत संधी मिळाली होती जेव्हा भारताला दुसरी स्ट्रिंग साइड निवडण्यास भाग पाडले गेले होते. दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेदरम्यान मधल्या षटकांमध्ये विकेट्स न मिळाल्याने संघ व्यवस्थापनाला कुलदीपकडे परत जाण्यास भाग पाडले आहे. याशिवाय विंडीजविरुद्ध दोन्ही संघांमध्ये वेगवान गोलंदाज आवेश खानची निवड करण्यात आली आहे, तर भुवनेश्वर कुमारला फक्त टी-20 सेटअपमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना संपूर्ण मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून अष्टपैलू व्यंकटेश अय्यरची केवळ टी-20 संघात निवड झाली आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा अद्याप तंदुरुस्त नसल्यामुळे त्यांना बाहेर बसावे लागले आहे.