IND vs WI 2nd T20I: लोकल खेळाडू संजू सॅमसन याचे तिरुअनंतपुरम विमानतळावर झाले भव्य स्वागत, पाहा Video
संजू सॅमसन (Photo Credit: IANS)

रविवारी ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्धच्या टी-20 सामन्याआधी तिरुवनंतपुरम विमानतळावर युवा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याचे एका हिरोसारखे स्वागत झाले. केरळमध्ये वर्ल्ड टी-20 चॅम्पियन्स वेस्ट इंडिजविरूद्ध तीन सामन्यांच्या मालिकेच्या दुसर्‍या सामन्यासाठी टीम केरळमधील स्थानिक संघाला स्थानिक पातळीवर पाठिंबा मिळाला. भारत (India) आणि विंडीज यांच्यातील दुसरा टी-20 सामना तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळला जाईल. पण या मॅचआधी लोकल खेळाडू संजू सॅमसन याला खेळायाला संधी मिळणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. जखमी शिखर धवन याच्या जागी वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेसाठी भारतीय टी-20 संघात सामील झालेला संजू जेव्हा तिरुअनंतपुरम विमानतळावर पोहचला तेव्हा त्याचे स्वागतासाठी हजारो चाहते एअरपोर्टवर पोचहले. (IND vs WI 2nd T20I 2019 Match Live Streaming: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)

आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने ट्विटरवर संजूचा एअरपोर्टवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चाहते संजू-संजू आणि सॅमसन-सॅमसनचे घोषणाबाजी करताना दिसतात. राजस्थान रॉयल्सने व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, “संजूचे नायकांचे स्वागत! # हल्लाबॉल | # रोयल्सफॅमली.” पाहा हा व्हिडिओ:

सुरुवातीला विंडीजविरुद्ध मालिकेसाठी निवडलेल्या 15 सदस्यीय भारतीय संघात सॅमसनला स्थान मिळाले नव्हते, पण सलामी फलंदाज शिखर धवनच्या दुखापतीनंतर केरळच्या या फलंदाजाला संधी मिळाली, पण पहिल्या मॅचमधील भारतीय संघाच्या प्लेयिंग इलेव्हनमधून त्याला बाहेरच राहावे लागले. केरळच्या स्थानिक खेळाडूने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसर्‍या टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळावी अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. तिरुअनंतपुरम हा सॅमसनचा होम ग्राऊंड आहे आणि त्याने येथे नुकत्याच खेळल्या गेलेल्या तीन सामन्यात अर्धशतकासह 103 धावा केल्या आहेत. 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 सामन्यातून सॅमसनने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ज्यानंतर त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. वेस्ट इंडिजपूर्वी बांग्लादेशविरूद्ध मालिकेसाठी सॅमसन देखील भारतीय संघाचा सदस्य होता पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.