IND vs WI 3rd T20I: रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांचा कहर, भारताचे वेस्ट इंडिजला 241 धावांचे विशाल लक्ष्य
रोहित शर्मा, विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

भारत आणि वेस्ट इंडीज संघातील अंतिम टी-20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे, जो निर्णायक आहे. या चुरशीच्या सामन्यात वेस्ट इंडीजने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत भारतीय संघ (Indain Team) प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 शतकात 3 बाद 240 धावा केल्या. पहिले फलंदाजी करत असलेल्या टीम इंडियासाठी केएल राहुल (KL Rahul)  याने सर्वाधिक धावा केल्या. राहुलने 55 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 91 धावा केल्या. विराट कोहली (Virat Kohli) धावांवर 70 नाबाद राहिला. टॉस गमावून फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाला रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुलच्या सलामी जोडीने तुफानी सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या 4.2 षटकांत 52 धावा आणि 8 षटकांत 102 धावा केल्या. यादरम्यान, रोहितने अवघ्या 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर राहुलने 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. विंडीजकडून जेसन होल्डर याने सर्वाधिक 54 धावा लुटवल्या. विंडीजकडून शेल्डन कोटरेल, किरोन पोलार्ड आणि केसरीक विल्यम्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.  (IND vs WI 3rd T20I: विराट कोहली याने टी-20 मध्ये रचला इतिहास, कोणताही भारतीय क्रिकेटपटू नाही करू शकलेला हा रेकॉर्ड)

भारतीय फलंदाजांनी विंडीज गोलंदाजांची क्लास घेतली. 135 धावांच्या स्कोरवर भारताला पहिला धक्का बसला जेव्हा रोहित 71 धावांवर  केसरिक विल्यम्स याचा बळी ठरला. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली याच्याऐवजी रिषभ पंत आला. दोन चेंडू खेळल्या पंतला किरोन पोलार्ड याने होल्डरकडे झेलबाद केले. पंतला एकही धाव करता आली नाही. पंतला कोहलीने मोठ्या फटकासाठी पाठवले, परंतु त्याला केवळ दोन चेंडूंचा सामना कराता आला. पोलार्डच्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर त्याने सीमेजवळील होल्डरला आपला झेल दिला.

दरम्यान, दोन्ही संघातील मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. हैदराबादअधिक पहिला टी -20 सामना भारताने जिंकला, तर वेस्ट इंडीजने दुसरा टी-20 जिंकला आणि मालिका बरोबरी साधली.