IND vs WI 3rd T20I: विराट कोहली याने टी-20 मध्ये रचला इतिहास, कोणताही भारतीय क्रिकेटपटू नाही करू शकलेला हा रेकॉर्ड
विराट कोहली (Photo Credit: @BCCI/Twitter)

वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळल्या जाणार्या तीन सामन्यांच्या मालिकेच्या अंतिम टी-20 सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. जेव्हा जेव्हा कोहली आपल्या बॅटसह मैदानात फलंदाजीला येतो तेव्हा तो त्याच्या नावे काही विक्रम करतो. अशाच प्रकारे कोहलीने टी-20 सामन्यात 6 धावा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका खास स्थान निर्माण केले आणि ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. वानखेडे स्टेडियममध्ये सामन्यात टॉस जिंकून विंडीज कर्णधार किरोन पोलार्ड याने पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस गमावून पहिले फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघासाठी (Indian Team) आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये कोहलीने घरच्या मैदानावर खेळताना 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. अश्या प्रकारची प्रभावी खेळी करणारा विराट पहिला भारतीय तर तिसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनला आहे. (IND vs WI 3rd T20I: एविन लुईस याची शानदार फिल्डिंग, रोहित शर्मा याने षटकारासाठी मारलेला चेंडू पकडण्याच्या प्रयत्नाला Netizens कडून दाद, पाहा हा Video)

जागतिक क्रिकेटमध्ये पाहिले तर आजवर घरच्या मैदानावर खेळताना न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिल याने 1430 आणि कोलिन मुनरो याने केवळ 1000 धावांची नोंद केली आहे. मात्र, रविवारी झालेल्या दुसर्या टी-20 सामन्यात उजव्या हाताचा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मागे टाकत विराट टी-20 मध्येसर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. या मॅचपूर्वी सर्वात कमी फॉर्मेटमध्ये कोहलीने 2,563 धावा केल्या आहेत तर रोहित फक्त एक धाव मागे 2,562 धावांसह दुसर्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, आजच्या मुंबई मॅचमध्ये एकीकडे वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात रोमांचक सामना होईल. त्याचबरोबर टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित आणि कर्णधार कोहली यांच्यातही पुढे जाण्याची स्पर्धा पाहायला मिळेल. मालिकेच्या अंतिम सामन्यानंतर रोहित आणि कोहली कोण पुढे असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.