(Photo Credit: @BCCI/Twitter)

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (West Indies) मधील तिसऱ्या आणि अंतिम वनडे मॅचमध्ये पहिले फलंदाजी करत विंडीजने भारतासमोर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे 255 धावांचे लक्ष्य दिले आहेत. विंडीज कर्णधार जेसन होल्डर (Jason Holder) याने टॉस जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या क्रिस गेल (Chris Gayle) आणि एव्हिन लुईस (Evin Lewis) यांनी स्लो सुरुवात केली. पण, त्यानंतर दोघांनी मोठे शॉट्स खेंण्यास सुरु केले आणि भारतीय गोलंदाजांना गोत्यात पडले. गेल आणि लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी 65 चेंडूत 115 धावांची भागिदारी केली. मागील सामन्यात अर्धशतक करणारा लुईस 29 चेंडूत 43 धावा करू शकला. त्याला युझवेन्द्र चहल याने माघारी धाडले. पावसामुळे सामन्यात अनेकदा व्यत्यय आला. आणि त्यामुळे दोन्ही संघांमध्ये 35ओव्हरचा खेळ करण्याचा निर्णय अंपायरांनी घेतला. (IND vs WI 3rd ODI: करिअरच्या अंतिम मॅचसाठी क्रिस गेल याने परिधान केली स्पेशल एडिशनची जर्सी)

आजच्या या सामन्यात गेल आणि लुईस यांनी यजमानांना चांगली सुरुवात करून दिली. पण, त्यानंतर पावसाने खेळात खोडा घातला आणि खेळ काही वेळासाठी ताम्बवण्यात आला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी खेळात पुनरागमन केले आणि एका मागोमाग एक विकेट घेत विंडीजला मोठे धक्के दिले. मधल्या फळीतील शिमरॉन हेटमायर, शे होप आणि निकोलस पूरण यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हेटमायरने 25, होपने 24 तर पूरणने 30 धावांचे योगदान दिले. भारतासाठी खालील अहमद याने तीन, मोहम्मद शमी याने 2 विकेट्स घेतल्या. तर, युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal) आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

दुसरीकडे, या मॅचमध्ये गेलने 41 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 71 धावांची तुफानी खेळी केली. पण, भारताचा वेगवान गोलंदाज खलील अहमद (Khaleel Ahmed) गेलला झेलबाद केले. भारताविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यानंतर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर गेल निवृत्त होणार, असे म्हटले जात होते. पण, गेलने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. विश्वचषकदरम्यान, गेलने जाहीर केले होते की तो या आयसीसी स्पर्धेनंतर निवृत्त होईल, मात्र नंतर त्याने भारतविरुद्ध टेस्ट मालिकेनंतर निवृत्ती घेण्याचे घोषित केले.