वेस्ट इंडीज (West Indies) क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर क्रिस गेल (Chris Gayle) याने विश्वचषकपूर्वी जाहीर केले की स्पर्धेणनंतर वनडे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल. पण, त्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला आणि म्हणाला की, भारत (India) विरुद्ध वनडे मालिकेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेईल. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात गेलने 41 चेंडूत 72 धावांची झंझावाती खेळी खेळली आणि जेव्हा तो बाद झाला आणि मैदानाबाहेर परतत होता, तेव्हा असे वाटले होते की ही शेवटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अंतिम वनडे मॅच होती. खालील अहमद (Khaleel Ahmed) याचा चेंडूवर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याचा झेल टिपला. बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या सर्व क्रिकेटर्सनी त्यांचे अभिनंदन केले आणि कॅरेबियन खेळाडूंनी उभे राहून टाळ्यांचा जयघोष केला. (IND vs WI 3rd ODI: क्रिस गेल याचा अखेरचा सामना, आऊट झाल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी खास शैलीत केले अभिवादन)
दरम्यान, आजचा सामान गेलच्या करिअरमधील 301 वा सामना होता. आणि सध्या सुरू असलेल्या विंडीजने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मॅचची सुरुवात करण्यासाठी गेल एका स्पेशल जर्सीसह फलंदाजीस आला. गेल, जो मर्यादीत शतकारांच्या मॅचमध्ये 333 नंबरची जर्सी परिधान करतो त्याने आजच्या मॅचसाठी 301 नंबरची जर्सी परधान केली होती. 333, हा गेलचा आंतरराष्ट्रीय टेस्ट करिअरमधील सर्वाधिक धाव संख्या आहे.
🌴v 🇮🇳
Special Edition!👕 Number 301 today to mark his 301st ODI!😎 #WIvIND #MenInMaroon #ItsOurGame pic.twitter.com/5lRLMaD9kV
— Windies Cricket (@windiescricket) August 14, 2019
मागील वनडेमध्ये गेलने विंडीजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा याचा मोठा विक्रम मोडला होता. गेलने लाराला पिछाडीवर टाकत विंडीजसाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड स्थापित केला. शिवाय, विंडीजसाठी सर्वाधिक 300 वनडे खेळणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.