(Photo Credit: AP/PTI)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघ यंदाच्या दौऱ्यात अंतिम वेळा आमने-सामने येण्यास सज्ज आहे. किंग्स्टन (Kingstan), जमैका (Jamaica) येथे दोन्ही संघातील दुसऱ्या आणि अंतिम टेस्ट सामना खेळाला जाईल. आजपासून सुरु होणाऱ्या या सामन्यात विराट कोहली आणि संघाची नजर विंडीजला क्लीन-स्वीप करण्याची असेल. पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह यांनी प्रभावी खेळी केली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात देखील त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. अँटिगामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला पण त्यांचा खेळाच्या निकालावर मोठा परिणाम झाला नाही. पण, पहिल्या दिवशी सबिना पार्कमध्ये हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. (IND vs WI 2nd Test: दुसऱ्या टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहली याची नजर एमएस धोनी, रिकी पॉन्टिंग आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या 'या' विक्रमांवर)

एक्यूवेदरच्या पूर्वानुमानानुसार, दिवसा वादळी वार्‍याची शक्यता आहे. तसेच पावसाचे प्रमाण 20 टक्के राहील. दिवसभर ढग फिरत राहतील आणि त्याचा परिणाम खेळावर होऊ शकेल. शिवाय, तापमान देखील 32 अंशापर्यंत वाढण्याची अपेक्षा केली जात आहे. आणि पाऊस पडदा राहिला तर सामन्यात पहिल्या दिवशी अडचण येऊ शकतात.

विंडीजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली याला अनेक विक्रमांना गवसणी घालण्याची संधी आहे. या वेळी कोहलीची नजर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) यांच्या विक्रमांवर असेल. विंडीजविरुद्ध दुसरा सामना जिंकत कोहली भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार बानू शकतो तर एक शतक करत तो पॉन्टिंग आणि स्मिथ यांना पिछाडीवर टाकू शकतो. पॉन्टिंग आणि कोहलीने कर्णधार म्हणून 19 टेस्ट शतक केले आहेत.