IND vs WI 2nd ODI: प्रसिद्ध कृष्णाने केला कहर, रोहित ब्रिगेडकडून वेस्ट इंडिजचा 44 धावांनी दारुण पराभव; 2-0 अजेय आघाडीसह मालिका केली काबीज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजाच्या शानदार खेळीच्या जोरावर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने वर्चस्व पूर्ण विजय मिळवला. भारताने दिलेल्या 238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीज संघ 45.5 षटकांत फक्त 193 धावाच करू शकला परिणामी पाहुण्या संघाला 44 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. आणि भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 विजयी आघाडी घेऊन मालिका काबीज केली. सूर्यकुमार यादव आणि प्रसिद्ध कृष्णा भारताच्या विजयाचे नायक ठरले. विंडीजसाठी शमर्ह ब्रुक्सने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली, तर अकील होसेनने 34 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेऊन विंडीज संघावर वर्चस्व गाजवले आणि भारताच्या झोळी विजय पाडला. प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच शार्दूल ठाकूरने 2, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक हुडाने प्रत्येकी एक गडी बाद केला. (IND vs WI 2nd ODI: Ouch! वेस्ट इंडिजच्या ओडियन स्मिथचा जबरदस्त कॅच घेताना विराट कोहलीचे डोके आपटले, पण नंतर थाटात चालू लागला Watch Video)

भारताविरुद्ध सलग दुसऱ्या वनडे सामन्यात विंडीजची कमजोर फलंदाजी समोर आली. कृष्णाने वेस्ट इंडिजला पहिला धक्का दिला आणि ब्रेंडन किंग 18 धावांत बाद केले. डॅरेन ब्रावो पुन्हा एकदा फ्लॉप झाला आणि फक्त 1 धाव करून माघारी परतला. शाई होपला 27 धावांवर चहलने बाद करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. त्यांनतर कृष्णाने आपली लय कायम ठेवली आणि विंडीजचा प्रभारी कर्णधार निकोलस पूरनला 9 धावांवर माघारी धाडले. अवघ्या 66 धावांत चार विकेट गमावलेल्या विंडीजला मागच्या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू जेसन होल्डर कडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण शार्दुलने फक्त दोन धावांत त्याला बाद करून यजमान संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आणि विंडीज संघाला पराभवाच्या जवळ नेले. ब्रुक्स संयमाने फलंदाजी करून एकहाती लढा देत राहिला, मात्र अर्धशतकाच्या जवळ असताना हुडाच्या फिरकीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आउट झाला.

निर्णायक क्षणी सामना आणखी रोमांचक झाला आणि विंडीज संघ मोठे फटके खेळून विजय मिळवून असे दिसत होता. तथापि शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने विकेट घेऊन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यापूर्वी टॉस गमावून पहिले फलंदाजी फलंदाजीला उतरल्यावर यजमान भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 64 आणि केएल राहुलने 49 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर 24 आणि दीपक हुडाने 29 धावा करुन चांगली साथ दिली.