IND vs WI 1st Test: वेस्ट इंडिजविरुद्ध विजयानंतर रोहित शर्मा याने घेतली अजिंक्य रहाणे-जसप्रीत बुमराह यांची मुलाखत, पहा हा व्हिडिओ
रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे,जसप्रीत बुमराह (Photo Credit: Twitter)

पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने यजमान वेस्ट इंडिजला (West Indies) तब्बल 318 धावांनी पराभूत केले आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय संपादन केला. चौथ्या दिवशी भारताने (India) दुसरा डाव 7 बाद 343 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात उपकर्णधार अजिंक्य रहाणे Ajinkya Rahane) याने 102 धावांची तर हनुमा विहारी याने 93 धावांची खेळी केली. 418 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गोलंदाजांनी सर्वोत्तम प्रदर्शन केले आणि विंडीजचा दुसरा डाव केवळ 100 धावांमध्ये आटोपला. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने 8 ओव्हरमध्ये केवळ 7 धावादेत 5 गडी टिपले. रहाणे आणि बुमराह भारताच्या विजयाचे शिल्पकार राहिले. पहिल्या डावांत रहाणेने अर्धशतकी खेळी केली होती आणि संघाला मोठी धावसंख्या करण्यास सहाय्य केले. तर इशांत शर्मा याने पहिल्या डावात 5 गडी बाद केले होते. (IND vs WI 1st Test: टीम इंडियाच्या Playing XI बद्दल सतत होणाऱ्या बदलांवर विराट कोहली याने केले 'हे' मोठे विधान)

विंडीजविरुद्ध पहिल्या टेस्टमधील विजयानंतर मर्यादित शतकारांचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फिरकीपटू युझवेन्द्र चहल याच्या अनुपस्थितीत अँकरची भूमिका बजावली. बीसीसीआय टीव्हीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहितने भारताच्या विजयाचे शिल्पकार राहिलेले रहाणे आणि बुमराह यांची मुलखात घेतली. यामध्ये दोघांनी आपापल्या खेळीबद्दल सांगितले. रहाणेने तब्बल २ वर्षानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये शतक केले आहेत. रहाणेने 2017मध्ये श्रीलंकाविरुद्ध शतकी कामगिरी केली होती. याचे श्रेय रहाणेने कठीण परिस्थितीत त्याला साथ देणाऱ्यांना समर्पित केले. पहा हा व्हिडिओ:

दरम्यान, चौथ्या दिवशी विराट कोहली 51 धावांवर बाद झाल्यानंतर रहाणेने तब्बल 2 वर्षांनंतर शतक करून भारताला मोठी आघाड़ी मिळवून दिली होती. रहाणेचे हे दहावे शतक असून, विहारी आणि कोहली यांच्यासोबत त्यानं शतकी भागिदारीही केली.