IND vs WI 1st Test: जसप्रीत बुमराह याने नोंदवला शानदार विक्रम, 'ही' ऐतिहासिक कामगिरी करणारा ठरला पहिला आशियाई गोलंदाज
जसप्रीत बुमराह: (Photo Credit: Twitter)

वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर 318 धावांनी विंडीजचा पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेला विजयी सुरुवात केली. पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवशी भारताने विंडीजला विजयासाठी 418 धावांचे तगडे आव्हान दिले होते. पण, विंडीजला ते आव्हान पेलले नाही आणि चौथ्याच दिवशी विंडीज संघ 100 धावांवर बाद झाला. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने प्रभावी खेळी केली. बुमराहने विंडीजचे दुसऱ्या डावात 5 गडी बाद केले आणि याच सह त्याने इतिहास रचला. बुमराहने फक्त 7 धावांमध्ये 5 गडी बाद केले. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि विंडीज या देशांविरुद्ध एकाच डावात 5 गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे. (IND vs WI 1st Test: विराट कोहली याने सुरु केली नवरात्रीची तयारी, मैदानातच केली दांडियाची प्रॅक्टिस)

बुमराहने आजवर 11 कसोटी सामने खेळले असून त्यानं या चारही देशांविरुद्धच्या पहिल्याच दौऱ्यात ही कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो आशियाई गोलंदाज ठरला आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 7 धावांवर 5 विकेट घेणारा बुमराह हा यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला. महत्वपूर्ण म्हणजे 2018 मध्ये पदार्पण करणाऱ्या बुमराहने टेस्ट क्रिकेटमधील त्याचे 50 कसोटी विकेट घेण्याचा टप्पा देखील ओलांडला. यापूर्वी भारताचे वेंकटेश राजू (Venkatesh Raju) यांनी श्रीलंकाविरुद्ध 1990 मध्ये 12 धावा देत 6 घेत हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. पण, या पाच विकेटसह बुमराहने विश्वविक्रमाची नोंद केली. आजवर अशी कामगिरी करणे कोणाही देशाच्या दिग्गज खेळाडूंना जमले नाही.

दरम्यान, विंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात भारताने 318 धावांनी दणदणीत विजय मिळवला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरवर भारताने पहिल्या डावत 297 धावा केल्या होत्या. त्यानंतर विंडीजनी 222 धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या डावातदेखील भारताने फलंदाजीत आपले वर्चस्व राखत 343 धावांवर डाव घोषित केला आणि विंडीजला 418 धावांचं आव्हानं दिलं होतं. त्यानंतर, गोलंदाजांनी विंडीजचा डाव 100 धावांवर संपुष्टात आणला.