कुत्रामुळे खेळात व्यत्यय (Photo Credits: Getty Images/ Twitter)

भारतीय क्रिकेटर्सची देशात खूप फॅन फॉलोईंग आहे. गेल्या काही महिन्यांत चाहत्यांनी सामन्यादरम्यान भारतीय चाहत्यांनी सामना सुरु असतानाच मैदानात घुसखोरी केली आणि त्यांच्या आवडत्या खेळाडूंसह सेल्फी क्लिक करण्याच्या इच्छेने सामन्यात अडथळा निर्माण झाला. पण, एका आश्चर्यचकित करणारा फॅन मैदानात घुसला ज्यामुळे सामना काही वेळ थांबविण्यात आला. भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात चेन्नई (Chennai) मध्ये सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यान कुत्रा मैदानात घुसला आणि सर्वांनाच धक्का बसला. कुत्रा सुमारे एक मिनिट मैदानावरच राहिला आणि त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला गेला. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत असताना काळ्या कुत्र्याने मैदानात प्रवेश केला. (IND vs WI 1st ODI: शेल्टन कोटरेल याने विराट कोहली याला बोल्ड केल्यावर Netizens ने आयपीएल फ्रेंचायझींना लिलावात मोठी बोली लावण्याचा केला आग्रह)

पहिल्या सामन्याच्या 26 व्या षटकानंतर ही घटना घडली. 27 शतक सुरू होण्यापूर्वी कुत्रा ग्राउंडमध्ये शिरला. या दरम्यान वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो क्षेत्ररक्षण करीत पलीकडे गेला. मैदानाच्या एका भागामधून आत आलेला कुत्रा थोड्याच वेळानंतर स्वतःच दुसर्‍या भागाच्या हद्दीतून बाहेर गेला. पाहा या मजेदार घटनेचा हा व्हिडिओ:

दरम्यान, सोशल मीडियावर यूजर्सने याबद्दल खूप आनंद लुटला आणि ट्विटकरत व्हिडिओही शेअर केले.

सामन्यात व्यत्यय आणणारा कुत्रा असाच असेल

सामन्यादरम्यान मैदानात कुत्रा... चाहत्यांची प्रतिक्रिया:

भारतीय फलंदाजीपेक्षा हा कुत्रा अधिक मनोरंजक आहे

मैदानात कुत्रा धावतोय

धोनीचा कुत्रा

दुसरीकडे, या सामन्यात भारताची सुरुवात इतकी मजेदार नव्हती. टीम इंडियाने आपल्या पहिल्या 3 फलंदाजांच्या विकेट 18 व्या षटकात केवळ 80 धावांवर गमावल्या. सर्वात पहिले राहुल 6 आणि नंतर कर्णधार विराट कोहली 4 धावांवर बाद झाले. रोहित शर्मा याने काही काळ श्रेयससह चांगली भागीदारी केली आणि संघास अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण 35 धावा करून तोही पॅव्हेलियनमध्ये परतला.