IND vs WI 1st ODI: शेल्टन कोटरेल याने विराट कोहली याला बोल्ड केल्यावर Netizens ने आयपीएल फ्रेंचायझींना लिलावात मोठी बोली लावण्याचा केला आग्रह
शेल्डन कोटरेल-विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये भारतीय (India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) धावा करण्यात अपयशी राहिला. कोहली अवघ्या 4 चेंडूत 4 धावा काढून बाद झाला. वेगवान गोलंदाज शेल्डन कोटरेल (Sheldon Cottrell) याने विराटला स्वस्तात बाद करून विंडीजला मोठे यश मिळवून दिले. कोटरेलच्या चेंडूवर कोहलीने पहिल्या चेंडूवर ऑफ ड्राइववर चौकार मारला, पण पुढील चेंडूवर कोटरेलने कोहलीला पॅव्हिलिअनचा रास्ता दाखवला. कोटरेलने यापूर्वी त्याच ओव्हरमध्ये सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) यालाही माघारी पाठवले होते. मात्र, शेल्टन कॉटरलने विराटला बाद करून आपल्या संघाला सर्वात मोठे यश मिळवून दिले. विराटसारख्या उत्कृष्ट फलंदाजाला कोटरेलए बर्‍याचदा त्रास दिला आहे. दरम्यान, कोटरेलने विराटला टाकलेला चेंडू पाहून नेटकरी बरेच प्रभावित झाले आणि त्यांनी आगामी आयपीएल लिलावासाठी फ्रेंचायझींना सल्लाच दिला.

2020 आयपीएलचा लिलाव (IPL Auction) 19 डिसेंबरला कोलकातामध्ये होणार आहे. कोटरेलने एकाच ओव्हरमध्ये सलामी फलंदाज राहुल आणि कोहलीला बाद केले ज्यानंतर चाहत्यांकडून त्याचे विशेष कौतुक केले जात आहे. अनेक यूजर्सने वेगवान गोलंदाजांसाठी फ्रँचायझींकडून बोली लावण्याची मागणी करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. विराटला चेन्नई एकदिवसीय सामन्यात बाद केल्यानंतर चाहत्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला कोटरेलसाठी बोली लावण्याचा सल्ला दिला. पाहा नेटिझन्सच्या प्रतिक्रिया:

संघाच्या गोलंदाजीसाठी चांगली भर आहे

शेल्डन कोटरेल चेन्नईमध्ये?

आरसीबी 2020

आरसीबी कृपया कोटरेलवर फोकस करा

कोटरेलने अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केले नाही परंतु त्याचा टी-20 रेकॉर्ड भारताविरुद्ध चांगला आहे. कोटरेलने 6 सामन्यांत 7 गडी बाद केले असून त्याचा इकॉनॉमी रेट फक्त 6.75 आहे. तसेचा कोटरेलने 22 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 30 विकेट घेतले आहेत.