IND vs SL T20I: श्रीलंकाविरुद्ध मालिकेत एमएस धोनी याला पिछाडीवर टाकत विराट कोहली याला भारताचा No 1 कर्णधार बनण्याची संधी, वाचा सविस्तर

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी नवीन वर्ष म्हणजेच 2020 हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. यावर्षी उत्कृष्ट धावा करणारा किंग कोहलीला यावर्षीही बऱ्याच मोठ्या विक्रमांची नोंद करण्याची संधी आहे. यामध्ये एक माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याचेही काही विक्रम आहे. आणि यातील एक तो श्रीलंकाविरुद्ध सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेदरम्यान तो करू शकतो. भारत आणि श्रीलंका (Sri Lanka) संघात 5 जानेवारीपासून 3 साम्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ नवीन वर्षातील पहिल्या मालिकेची विजयी सुरुवात करू पाहत असेल. यामध्ये सर्वांचे लक्ष असेल ते भारताचा कर्णधार विराटकडे. विराटने मागील वर्षी बॅटने अनेक गोलंदाजांची शाळाच घेतली. आणि यावर्षी तो आपला जुना घातक फॉर्म कायम ठेवत अनेक नवीन विक्रम असेल यावर सर्वांच्या नजरा असतील. आणि या मालिकेत 24 धावा करताच विराट टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 1,000 धावा पूर्ण करणारा सहावा आंतरराष्ट्रीय, तर फक्त दुसरा भारतीय क्रिकेटपटू बनेल. कोहलीने आजवर 30 सामन्यांच्या 29 डावात कर्णधार म्हणून 976 धावा केल्या आहेत. (IND vs SL 2020 T20I: भारत दौऱ्यासाठी श्रीलंका संघ जाहीर, 18 महिन्यानंतर अँजेलो मॅथ्यूज याचे पुनरागमन)

टी-20 मध्ये एक हजार धावा पूर्ण करणारा विराट दुसरा भारतीय कर्णधार असेल. माजी कर्णधार धोनीने भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक 1,112 धावा केल्या आहेत. धोनीने 72 साम्यांच्या 62 डावांमध्ये ही कामगिरी बजावली आहे. विराट धोनीच्या 136 धावा मागे आहे. श्रीलंकाविरुद्ध मालिकेत या धावा करताच विराट धोनीला पिछाडीवर टाकले आणि कर्णधार म्हणून भारताकडून सर्वाधिक धावांची नोंद करेल. दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) याने कर्णधार म्हणून सर्वाधिक 1273 टी-20 धावा केल्या आहेत.

भारत आणि श्रीलंका संघातील ही सातवी द्विपक्षीय टी-20 मालिका असेल. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सहा द्विपक्षीय टी-20 मालिकेपैकी भारताने पाच जिंकल्या आहेत, तर मालिका बरोबरीत राहिली आहे. दोन्ही संघात एकूण 16 सामने खेळले गेले असून त्यापैकी 11 सामने भारत आणि पाच श्रीलंकेने जिंकले आहेत. यासाठी भारत आणि श्रीलंका बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. विराट भारताचे, तर लसिथ मलिंगा श्रीलंकाचेनेतृत्व करेल.