टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL Series 2022: रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध तीन  सामन्यांच्या टी-20 मालिकेत व्यस्त आहे. यानंतर रोहित ब्रिगेड श्रीलंकेचा टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी (Sri Lanka Series) पाहुणचार करेल. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारत श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. आणि वृत्तानुसार, भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) गेल्या वर्षीअखेरीस पहिल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतून बाहेर राहिल्यानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. 33 वर्षीय खेळाडूचे पुनरागमन जवळपास निश्चित आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार जडेजा कसोटी संघात आणि T20 मालिकेचा भाग बनू शकतो. गुडघ्याच्या दुखापतीमुळे 33 वर्षीय खेळाडू पहिले न्यूझीलंड आणि नंतर दक्षिण आफ्रिका व विंडीज मालिकेला मुकला. (IND vs SL Test Series 2022: श्रीलंका कसोटी मालिकेसाठी ‘या’ तीन मोठ्या खेळाडूंना आराम मिळण्याची शक्यता!)

अहवालानुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन करत असलेला जडेजा लखनौ येथे दाखल झाला आहे, जिथे 24 फेब्रुवारी रोजी तीन टी-20 सामन्यांपैकी पहिला सामना खेळवला जाणार आहे. जडेजा हॉटेलमध्ये क्वारंटाईन असल्याचे मानले जात असून निवडल्यास मालिकेसाठी उपलब्ध होईल. याशिवाय फक्त जडेजाच नाही तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) विश्रांतीनंतर या आगामी मालिकेत पुनरागमन करू शकतो. बुमराहला मोहम्मद शमी आणि जडेजासह विंडीजविरुद्ध मालिकेतून आराम देण्यात आला होता. दरम्यान, आगामी श्रीलंका मालिकेसाठी संघाची घोषणा एक-दोन दिवसांत केली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच निवडकर्ते भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधाराचे नाव देतील जाहीर करतील.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यावर विराट कोहली गेल्या महिन्यात पायउतार झाला होता. त्यामुळे खेळाच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमधेही टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर पडणार असल्याची शक्यता आहे असे अहवालात पुढे म्हटले आहे. तसेच, क्रिकबझच्या मते विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्ध T20 सामन्यांसाठी विश्रांती दिली जाऊ शकते परंतु भारताचा माजी कर्णधार कसोटी मालिकेसाठी परत येईल, म्हणजे मालिकेसाठी त्याची निवड झाल्यास तो मोहालीमध्ये 100 वा कसोटी खेळेल.