IND vs SL Test Series 2022: श्रीलंका कसोटी मालिकेसाठी ‘या’ तीन मोठ्या खेळाडूंना आराम मिळण्याची शक्यता!
टीम इंडिया (Photo Credit: Twitte/ICC)

IND vs SL Test 2022: वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर टीम इंडिया (Team India) काही दिवसात श्रीलंकेचा पाहुणचार करेल. भारत दौऱ्यावर श्रीलंका (Sri Lanka Tour of India) संघ पहिले तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळले त्यानंतर दोन्ही संघ दोन कसोटी सामन्यांमध्ये आमनेसामने येतील. भारताने अद्याप कसोटी क्रिकेटमधील आपल्या पूर्णवेळ कर्णधाराची घोषणा केलेली नाही. तथापि अलीकडील अहवालानुसार, नेतृत्वाची भूमिका घेण्यासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहली कसोटी संघाच्या नेतृत्व पदावरून पायउतार झाला. तर रोहित दुखापतीमुळे संपूर्ण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडला होता. तसेच कर्णधार व्यतिरिक्त, भारताने अद्याप कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केलेली नाही. अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे आणि काही वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो. (IND vs SL: भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक जाहीर, 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिकेला होणार सुरुवात)

1. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)

गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत असूनही रहाणेला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत पाठिंबा मिळाला होता. न्यूझीलंड कसोटी मालिकेत तो प्रभाव पाडू शकला नाही आणि दक्षिण आफ्रिकेतही तो संघात योगदान देण्यात अपयशी ठरला. आफ्रिकेविरुद्ध 3 कसोटी सामन्यात त्याने 22.67 च्या सरासरीने 136 धावा केल्या. तसेच संघ व्यवस्थापन भारताच्या माजी कसोटी उप-कर्णधारच्या पुढे विचार करत आहे आणि त्यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताच्या संघात घेतले जाणार नाही.

2. इशांत शर्मा (Ishant Sharma)

इशांत शर्माने नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेसाठी शर्माचा भारताच्या संघात समावेश करण्यात आला होता पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. भारतीय क्रिकेटने कसोटी क्रिकेटमध्ये संक्रमणाचा टप्पा सुरू केला आहे आणि त्यामुळे वरिष्ठ वेगवान गोलंदाजाला कसोटी संघात परत स्थान मिळवणे कठीण होऊ शकते. तसेच वृत्तांनुसार निवडकर्ते युवा वेगवान गोलंदाजांना संधी देण्याचा विचार करत आहेत आणि त्यामुळे शर्माला श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते.

3. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)

पुजारा गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या कसोटी संघात महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयांमध्ये त्याने बॅटने काही महत्त्वाचे योगदान दिले आहे. कसोटी क्रिकेटमधील त्याच्या क्षमतेवर शंका नाही, तथापि पुजाराने त्याच्या गेल्या काही वर्षांतील कामगिरीकडे लक्ष दिलेले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या सीमर-फ्रेंडली खेळपट्टीवर पुजाराने खराब खेळ केला. 3 कसोटीत तो 20.67 च्या सरासरीने केवळ 124 धावा करू शकला. अशा परिस्थितीत श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संघ व्यवस्थापनाने चेतेश्वर पुजाराला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्यास आश्चर्यकारक ठरणार नाही.