आयसीसी (ICC) विश्वचषकमध्ये श्रीलंका (Sri Lanka) संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारत (India) विरुद्ध त्यांचा शेवटचा सामना आज हेडिंग्ले (Headingley) येथे खेळाला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंका ने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत.युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. तर, शमीच्या जागी जडेजाला संघात संधी देण्यात आली आहे. श्रीलंका संघात एक बदल करण्यात आला आहे. थिसारा परेरा (Thisara Perera) याला संघात स्थान देण्यात आले आहेत.
(India vs Sri Lanka Live Cricket Streaming on DD Sports and Prasar Bharati Sports for Free: रेडिओ वर लुटा IND vs SL मॅच चा LIVE आनंद)
दरम्यान, आज विश्वकपमध्ये दोन सामने होणार आहे. एकीकडे भारत-श्रीलंका तर दुसरीकडे पहिल्या क्रमांकाचा ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिका शी दोन हात करेल. आजचे हे दोन सामने निश्चित करणार सेमीफाइनलमध्ये भारताची लढत कोणत्या संघाशी होणार. सेमीफायनलमध्ये गुणतालिकेतील पहिल्या स्थानावरील संघाचा सामना चौथ्या क्रमांकावरील संघाशी होतो. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये दुसरी सेमीफायनलची लढत होईल. सध्या गुणतालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. साखळीफेरीमधील आपल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ जिंकले किंवा पराभूत झाले तरी ते पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानीच राहतील. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सेमीफायनलमध्ये आमने-सामने येणार नाहीत.
भारत पहिल्या क्रमांकावर राहिला तर चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंड संघाचे आव्हान असेल. पण सेमीफायनलमध्ये भारताची लढत यजमान इंग्लंड संघाशी होण्याची शक्यता आहे. असे आहेत संघ
भारतीय संघ : विराट कोहली(कॅप्टन), जसप्रीत बुमराह,कुलदीप यादव, ऋषभ पंत, महेंद्र सिंह धोनी, रवींद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल, रोहित शर्मा,
श्रीलंका संघ: दिमुथ करुणारत्ने (कॅप्टन), कुशल परेरा, अविश्का फर्नांडो, कुशल मेंडिस, थिसारा परेरा, लाहिरू थिरिमाने, एंजेलो मैथ्यूज, धनंजय डी सिल्वा, इसुरु उदाना, कसून रजिथा, लसिथ मलिंगा.