श्रीलंका (Sri Lanka) संघाचे विश्वचषकमधील निराशाजनक कामगिरीचे सत्र आजही कायम राहिले. संघाचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. मात्र, अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) ची एकाकी झुंजीच्या जोरावर श्रीलंकेने टीम इंडियासामोर 265 धावांचे लक्ष्य ठेवले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि अन्य गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेला 50 षटकात 7 बाद 264 धावा केल्या. मॅथ्यूजचे शतक आणि लहिरु थिरमाने (Lahiru Thirimane) च्या अर्धशतकामुळे भारत (India) विरुद्ध मॅचमध्ये श्रीलंकेला सावरलं आहे. मॅथ्यूजचं हे वनडे क्रिकेटमधलं तिसरं शतक होतं. मुख्य म्हणजे मॅथ्यूजने वनडे क्रिकेटमधली त्याची तिन्ही शतकं भारताविरुद्ध केली आहेत. (IND vs SL World Cup 2019: अँजेलो मॅथ्यूज च्या शतकी खेळीसह, श्रीलंकाचे टीम इंडिया समोर 265 धावांचे लक्ष्य)
दरम्यान, यंदाच्या विश्वचषकमधील पहिल्या आपल्या पहिल्या शतकाने मॅथ्यूज याने एक विश्वकप विक्रम मोडला आहे. भारत विरूद्ध विश्वचषकात शतक झळकावणारा मॅथ्यूज दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी 2011 च्या विश्वकपमधील अंतिम फेरीत श्रीलंकेच्या महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) 103 नाबाद धावा केल्या होत्या. मॅथ्यूजने 128 बॉलमध्ये 113 रन केले. भारत विरुद्ध श्रीलंकाच्या फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.
दरम्यान, आयसीसी विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने आधीच प्रवेश केला आहे. तर श्रीलंका स्पर्धेतून बाहेर झाली आहे. श्रीलंकेविरुद्ध मॅचमध्ये टीम इंडिया ने विजय मिळवल्यास आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने ऑस्ट्रेलिया (Australia) चा पराभव केला तर टीम इंडिया गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाईल.