भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

How To Watch IND vs SL Live: धर्मशाला (Dharmasala) येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर रविवारी भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना होणार आहे. लखनऊ येथे मालिकेतील पहिला सामना 62 धावांनी जिंकल्यानंतर, ‘रोहितसेने’ने शनिवारी आणखी एक दमदार कामगिरी करत सात विकेटने विजयावर शिक्कामोर्तब केला. आणि आता रविवारी विजय भारतीय क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सलग तिसरा व्हाईटवॉश (Whitewash) विजय ठरेल. यापूर्वी त्यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचा 3-0 च्या फरकाने पराभव केला होता. युएईमध्ये गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकपासून रोहित शर्मा अँड कंपनीचा सध्या सुरु असलेल्या सलग 11 सामन्यांत अपराजित सिलसिला सुरु झाला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट आणि ऑनलाईन स्ट्रीमिंगची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे. (IND vs SL: ईशान किशनला रुग्णालयातून डिस्चार्ज पण तिसरा T20 खेळण्यावर टांगती तलवार, ‘या’ फलंदाजाला मिळू शकते टी-20 डेब्यू तिकीट)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 27 फेब्रुवारी (रविवार) रोजी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (HPCA), धर्मशाला येथे खेळवला जाईल. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-20 भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता सुरु होईल, तर नाणेफेक संध्याकाळी 6:30 वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये भारतीय चाहते श्रीलंकाविरुद्ध संघाच्या मालिकेतील तिसऱ्या व अंतिम सामन्याचा आनंद लुटू शकतात. तर भारतीय संघाचा एक लहान स्वरूपाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे, त्यामुळे तुम्ही तो DD Sports वर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या टी-20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पहायचे असेल, तर तुम्ही ते Disney+Hotstar अॅप किंवा वेबसाइटवर पाहू शकता.

भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 संघ

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, दीपक हुडा, आवेश खान, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल.

श्रीलंका संघ: दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, दानुष्का गुनाथिलका, कामिल मिश्रा (विकेटकीपर), चमिका करुणारत्ने, दिनेश चंडीमल, चरित असलंका, जेफ्री वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, जेनिथ लियानागे, आशियान डॅनियल, शिरन फर्नांडो आणि बिनुरा फर्नांडो.