ईशान किशनच्या डोक्याला मार (Photo Credit: PTI)

IND vs SL: भारताचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशनला (Ishan Kishan) हिमाचल प्रदेशातील कांगरा (Kangara) येथील रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तथापि, ईशान रविवारी धर्मशाला (Dharmshala) येथे श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) मालिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात खेळण्याची शक्यता नाही. किशनला शनिवारी श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 दरम्यान डोक्याला दुखापत झाली आणि त्याला हिमाचल प्रदेशातील कांगरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारताच्या डावाच्या चौथ्या षटकात लाहिरू कुमाराच्या धोकादायक बाऊन्सरमुळे किशनला फटका बसण्याची घटना घडली. चेंडू डोक्याला लागल्यामुळे श्रीलंकेचे क्षेत्ररक्षक त्याच्या भोवती जमले असतानाही किशनने हेल्मेट काढले. खबरदारीचा उपाय म्हणून ईशानला सामान्य वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आणि त्याला दाखल केल्यावर लगेचच CT स्कॅन करण्यात आले. (IND vs SL T20: श्रीलंकाविरूद्ध टीम इंडियाच्या शानदार विजयासह T20 मालिका विजयाची हॅट्ट्रिक, श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीच्या जोरावर 7 विकेट्सने विजय)

अशा परिस्थतीत ईशानच्या जागी विकेट कीपिंगसाठी संजू सॅमसन (Sanju Samson) एक पर्याय उपलब्ध असून किशनच्या अनुपस्थितीत मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) सलामीला उतरू शकतो. यापूर्वी रुतुराज गायकवाड मनगटाच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर अग्रवाल भारतीय संघात सामील झाला. मयंकला संधी मिळाल्यास श्रीलंकेविरुद्ध आजचा सामना त्याचा टी-20 पदार्पण सामना ठरू शकतो. मयंक अग्रवाल यापूर्वी न्यूझीलंडमध्ये 2020 मध्ये अखेर एकदिवसीय सामना खेळला होता. अग्रवालला 4 मार्चपासून श्रीलंकेचा सामना करण्यासाठी भारताच्या उर्वरित कसोटी संघासह चंदीगडमध्ये क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये एकूण मोठ्या आव्हानात्मक धावसंख्याचे पाठलाग केल्यानंतर, भारताची नजर आता श्रीलंकेविरुद्ध धर्मशाला येथे होणार्‍या तिसऱ्या टी-20 मध्ये आणखी एक सकारात्मक निकालाकडे असेल. भारत सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 11 सलग सामने जिंकण्याचा सिलसिला देखील कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार असेल.

श्रीलंकाविरुद्ध अंतिम सामन्यातील विजय त्यांच्या सलग आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत विजयाची संख्या 12 वर जाईल आणि टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक काळ जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी होईल. सध्या अफगाणिस्तान आणि रोमानिया यांनी संयुक्त 12 टी-20 सामने जिंकले आहे.