टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd ODI: श्रीलंका दौऱ्यावरील (Sri Lanka Tour) अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) टॉस जिंकला आहे पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आजच्या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये (India Playing XI) साहा बदल झाले असून पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, श्रीलंकन इलेव्हनमध्ये देखील तीन बदल पाहायला मिळत आहेत. दोन्ही सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे शुक्रवारी होणारा तिसरा सामना जिंकून श्रीलंकेला त्यांच्याच मायभूमीत व्हाईटवॉश देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तर श्रीलंका संघ व्हाईटवॉश टाळून आपली प्रतिष्ठा वाचवण्याच्या दृष्टीने तिसऱ्या सामन्यात उतरेल. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. (IND vs SL 3rd ODI Live Streaming: भारत आणि श्रीलंका तिसरा वनडे सामन्याचे थेट प्रसारण, लाईव्ह स्ट्रीमिंग कसे आणि कुठे पाहणार?)

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे तर नवदीप सैनी संघात परतला असून संजू सॅमसन, नितीश राणा, चेतन सकारिया, कृष्णाप्पा गौथम आणि राहुल चाहर हे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहेत. तसेच कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, ईशान किशन, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. ईशानच्या जागी सॅमसन तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरेल. तसेच पहिल्या दोन्ही सामन्यात फेल ठरलेल्या मनीष पांडेचे टीम इंडिया इलेव्हनमधील स्थान कायम राहिले आहे. भारतीय संघाने मालिका आधीच खिशात घातलेली असल्याने संघव्यवस्थापन तिसऱ्या वनडेसाठी अंतिम 11 मध्ये नवीन खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आहे. दुसरीकडे श्रीलंकेने ईशान जयरत्ने, अकिला डानंजया, रमेश मेंडिस यांचा समावेश केला आहे.

पाहा प्लेइंग इलेव्हन

भारत प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, संजू सॅमसन (विकेटकीपर), मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, नितीश राणा, के. गौतम, राहुल चाहर, नवदीप सैनी, आणि चेतन सकारिया.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: दासुन शनाका ((कॅप्टन), अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (विकेटकीपर), भानुका राजपक्ष, धनंजय डी सिल्वा, चरिथ असलंका, रमेश मेंडिस, चमिका करुणरत्ने, अकिला धनंजय, दुशमंत चमीरा, प्रवीण जयविक्रम.