IND vs SL 3rd ODI: अखेरच्या वनडे सामन्यात टीम इंडियामध्ये मोठा बदल संभव, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी; पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd ODI 2021: श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) मंगळवार, 20 जुलै रोजी झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) रोचक सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवून सामन्यासह मालिकाही खिशात घातली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सध्या धवन ब्रिगेड 2-0 अशा विजयी आघाडीवर आहे. एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवारी पुन्हा कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघाने यापूर्वी वनडे मालिका जिंकली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाने (Team India) तिसर्‍या सामन्यात काही नवीन खेळाडूंना संधी देऊ शकते. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ काही युवा खेळाडूंना संधी देत आगामी टी-20 मालिकेसाठी मुख्य खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. पाहा तिसऱ्या कोलंबो वनडे सामन्यासाठी संभाव्य भारतीय इलेव्हन. (IND vs SL 2nd ODI: भारताच्या विजयानंतर Mickey Arthur यांचा चेहरा उतरला, मैदानात श्रीलंकन कर्णधार Dasun Shanaka याच्याशी जाऊन भिडले; पाहा व्हायरल Video)

नितीश राणा (Nitish Rana)

नितीश राणाने गेली काही वर्षे घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. दुसरीकडे, पहिल्या एकदिवसीय सामन्यात मनीष पांडे फ्लॉप ठरला, 40 चेंडूत 26 धावा करून तो बाद झाला. तसेच दुसऱ्या वनडे सामन्यात 31 चेंडूत 37 धावाच करू शकला. पहिल्यादा दोन्ही सामन्यात मनीषचे बॅटने अपयश त्याच्या विरोधात जाऊ शकते आणि टीम नितीश राणाला संधी देण्याचा नक्कीच विचार करू शकते.

संजू सॅमसन (Sanju Samson)

पहिल्या वनडे सामन्यासाठी सॅमसन विकेटकीपर म्हणून संघाची पहिली पसंत होता पण दुखापतीने त्याच्या एकदिवसीय पदार्पणाची संधी हिरावली. पण आता तो पूर्णपणे फिट झाला असून ईशान किशनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होईल शकतो. अंतिम वनडे सामन्यात संधी दिल्यास सॅमसन धावा करून आगामी टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात जागेसाठी दावा ठोकू शकतो.

वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy)

आयपीएल स्पर्धेत चक्रवर्तीने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे अशा परिस्थितीत राहुल द्रविड देखील वरुणला या सामन्यात पदार्पण करण्याची संधी इच्छित असेल. अशास्थितीत तो तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवच्या जागी डेब्यू करू शकतो.

भारत 3rd वनडे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, संजू सॅमसन (विकेटकीपर), नितीश राणा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, युजवेंद्र चहल आणि वरुण चक्रवर्ती.