IND vs SL 2nd Test 2022: बंगळुरूच्या (Bangalore) एम चिन्नास्वामी स्टेडियम विरुद्ध श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) टीम इंडिया (Team India( 12 मार्चपासून गुलाबी चेंडूने दिवस/रात्र कसोटी सामना खेळणार आहे. शुक्रवारी टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पत्रकार परिषद घेऊन सामन्याच्या तयारीविषयी माहिती दिली. बुमराहने सांगितले की यजमान डे-नाईट कसोटी खेळण्यापूर्वी ‘मानसिक समायोजन’ करत आहेत कारण गुलाबी-बॉलचा सामना ही आजही एक नवीन संकल्पना आहे. बंगळुरू येथील दिवस-रात्र कसोटी सामन्यात जेव्हा बुमराहला भारतीय प्लेइंग-11 मधील बदलाबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला- आम्ही बऱ्याच दिवसांनी पिंक बॉल टेस्ट खेळणार आहोत, टीम मिटिंगमध्ये बदल होणार की नाही यावर चर्चा झाली आहे. खेळपट्टी पाहूनच आम्ही प्लेइंग-11 निवडू, असे आम्ही ठरवले आहे. यापूर्वी भारतीय संघ बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध गुलाबी कसोटी खेळला आहे. (IND vs SL 2nd Test: पिंक-बॉल कसोटीपूर्वी Rohit Sharma याला दिग्गज खेळाडूचा सल्ला, ‘हिटमॅन’ला त्याचा ट्रेडमार्क शॉट शॉट न खेळण्याचे केले आवाहन)
दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अक्षर पटेलचे (Axar Patel) भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. अक्षर संघात आल्यानंतर कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संघातून बाहेर करण्यात आले. यावर बुमराहला प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “कुलदीपला वगळण्यात आलेले नाही. जर एखाद्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी असेल तर त्याला बायो-बबलमध्ये विश्रांती दिली जाते. कुलदीप बराच काळ बबलमध्ये होता आणि प्रत्येक खेळाडूसाठी हे कठीण असते.” कुलदीपला कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले होते परंतु भारताने मोहाली कसोटीत 3 फिरकीपटू खेळवले असूनही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकली नाही. दुसरीकडे, बुमराहने अक्षराची भरपूर प्रशंसा केली आणि म्हटले की अष्टपैलू खेळाडू संघात परतल्याने खूप मोलाची भर पडते.
अक्षर पटेलबद्दल जसप्रीत म्हणाला, “जेव्हा पण अक्षर संघासोबत खेळला आहे, तेव्हा त्याने प्रत्येक विभागात योगदान दिले आहे. त्याला दुखापत झाली होती, मात्र आता तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने संघात पुनरागमन केले आहे. त्याला संघात संधी देण्यासाठी आम्ही सांघिक संयोजनावर चर्चा करू. अक्षर हा हुशार खेळाडू आहे.” रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा प्लेइंग इलेव्हनमध्ये निश्चित असल्याने अक्षर बंगळुरूमध्ये खेळणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.