IND vs SL 2nd T20I: जसप्रीत बुमराह याने श्रीलंकाविरुद्ध घेतली 1 विकेट, आर अश्विन आणि युजवेंद्र चहल यांची केली बरोबरी
जसप्रीत बुमराह (Photo Credit: Getty Images)

भारतीय संघाचा (Indian Team) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने स्ट्रेस फ्रैक्चरनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. श्रीलंके (Sri Lanka) विरुद्ध 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पुनरागमन करीत बुमराहने भारतीय संघासाठी बनवलेल्या रेकॉर्डची बरोबरीची केली आहे.आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरला. श्रीलंका संघाविरुद्ध दुसर्‍या सामन्यात बुमराहनेआंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची बरोबरी केली.आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये बुमराहने आता 52 विकेट घेतले आहेत. आणि आर अश्विन (R Ashwin) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्यासमवेत संयुक्तपणे पहिल्या स्थानी पोहचला आहे. एकेकाळी भारतीय संघाच्या शॉर्ट फॉरमॅटमध्ये प्रीमियर स्पिनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विन आणि चहलने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून प्रत्येकी 52-52 गडी बाद केले. श्रीलंकाविरुद्ध या सामन्यापूर्वी बुमराहच्या नावे 51 गडी होते. (IND vs SL 2nd T20I: भारतीय गोलंदाजांचा प्रभावी मारा, श्रीलंकेचे टीम इंडियाला 143 धावांचे लक्ष्य)

भारताकडून टी-20, वनडे आणि टेस्टमध्ये 50 किंवा अधिक विकेट घेणारा भारताचा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. बुमराहने भारतीय संघासाठी 43आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले असून त्याने 52 गडी बाद केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये बुमराहची सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी 3 बाद 11 धावा अशी आहे.मात्र, बुमराहला टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 विकेट घेता आले नाही. श्रीलंकेच्या दासुन शनाका याला बुमराहने बाद करत अश्विन आणि चहलची बरोबरी केली.

श्रीलंकाविरुद्ध सामन्याबद्दल बोलले तर, टॉस गमावून पहिले फलंदाजी करत भारताला 143 धावांचे लक्ष्य दिले. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत अगदी मिळवू पाहिलं. गुवाहाटीमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने आता दोन सामने होणार आहे. इंदोरनंतर तिसरा आणि अंतिम सामना पुणेमध्ये खेळला जाईल.