IND vs SL 2nd T20I, Dharamshala Weather Forecast: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेची जबरदस्त सुरुवात झाली आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने संपूर्ण वर्चस्व गाजवून पाहुण्या संघावर 62 धावांच्या मोठ्या फरकाने मात केली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता टीम इंडिया सलग तिसरी टी-20 मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने धर्मशाला (Dharamshala) येथे आज रवाना होणार आहे. श्रीलंकाविरुद्ध मालिकेचे उर्वरित दोन सामना आता धर्मशाला येथील HPCA स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. धर्मशाला हे आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यासाठी एक दुर्मिळ ठिकाण आहे, परंतु या ठिकाणी अनेक IPL सामने आयोजित केले गेले आहेत. पण एक हिल स्टेशन असल्यामुळे या ठिकाणी अनेकदा सामने पावसाने खराब केले आहेत. अशा परिस्थितीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी येथील धर्मशाला हवामानाची (Dharamshala Wearther Updates) संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिली आहे. (IND vs SL: रोहित शर्मा मोडू शकणार MS Dhoni याचा श्रीलंकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील ‘हा’ मोठा रेकॉर्ड? धर्मशालाचे हवामान बनू शकते अडथळा)
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात सलग दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत एकहाती वर्चस्व गाजवलेल्या भारतीय संघाकडे आता श्रीलंकन वाघांचा सुपडा साफ करण्याची संधी आहे. पण एक गोष्ट भारताविरुद्ध ठरू शकते आणि ती म्हणजे धर्मशाला येथील हवामान. भारत 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध सलग दोन टी-20 सामने खेळणार आहे. 26 फेब्रुवारीला तापमान 10 अंशांपर्यंत खाली आल्याने पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना कदाचित पावसामुळे खराब होऊ शकतो. तसेच लखनऊच्या तुलनेत येथे रात्री हवामान खूपच थंड राहण्याची अपेक्षा आहे. आणि फक्त प्रवासासाठी एकच दिवस असल्यामुळे खेळाडूंना परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी थोडाच वेळ मिळेल.
दुसरीकडे, भारत धर्मशाला येथे आणखी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल तर, भारताची 10 सामन्यांची विजयी मालिका संपवण्यासाठी श्रीलंकेला विशेष प्रयत्न करावे लागतील. विद्यमान कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात सलग 10 टी-20 सामने जिंकणारा भारत कसोटी क्रिकेट खेळणारा दुसरा संघ आहे. माजी कर्णधार विराट कोहलीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध सलग विजयाने भारताचा टी-20 मधील अपराजित सिलसिला सुरू झाला.